वालचंदला आठव्यांदा जेतेपद
By admin | Updated: September 13, 2014 00:02 IST
सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
वालचंदला आठव्यांदा जेतेपद
सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धासोलापूर: सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सलग आठव्यांदा जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली़ ए़ जी़ पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू सोनिया देशमुख हिने सात गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर डब्ल्यूआयटी संघाने 23 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला़या संघातील कर्णधार सोनिया देशमुख, विक्रम कोठेकर, निखिल बीडकर, सौरभ व?मवार, प्रतीक शहा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली़ विद्यापीठ संघात सोनिया देशमुख, विक्रम कोठेकर यांची निवड झाली़त्यांना क्रीडाशिक्षक सचिन देशमुख, मिलिंद महिमाने यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थेचे मानद सचिव डॉ़ रणजित गांधी, प्राचार्य डॉ़ शशिकांत हलकुडे यांनी कौतुक केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)फोटोओळी-सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सलग आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसोबत सचिन देशमुख, शशिकांत हलकुडे, मिलिंद महिमाऩे