मॉस्को : पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकला नाही; त्यामुळे त्याला येथे १०व्या ताल मेमोरियल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलरसोबतची लढत ड्रॉवर सोडवावी लागली.आजचा दिवस निरस ठरला आणि दोन लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सर्व सामने ड्रॉ झाले.रशियाचा इयान नेपोमनियाची याने ४.५ गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे, तर नेदरलँड्सचा अनिष गिरी अर्ध्या गुणाने पिछाडीवर असून दुसऱ्या स्थानी आहे.आनंद, रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक आणि अर्मेनियाचा लेवोन अरोनियन हे संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहेत.स्विडलर आणि चीनचा ली चाओ ३.५ गुणांसह संयुक्तरीत्या सहाव्या स्थानावर आहे. शखरियार मामदयारोव्ह ३ गुणांसह सहाव्या स्थानावर, तर रशियाचा येवगनी तोमशेवस्की २.५ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)इस्राईलचा बोरीस गेलफंड एका गुणासह दहाव्या आणि अखेरच्या क्रमांकावर आहे.०००
विश्वनाथन आनंदने स्विडलरसोबत ड्रॉ खेळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 04:56 IST