शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविजयाचे स्वप्न भंगले! अंतिम लढतीत भारतीय महिला संघ पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:20 IST

महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले.

ऑनलाईन लोकमत
लंडन, दि. 23, -  महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली.  
 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्या झुंजार खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने या आव्हानाचा --- षटकात फडशा पाडला.  समोर माफक आव्हान असले तरी सलामीची स्मृती मंधाना (0) आणि कर्णधार मिताली राज (17) या झटपट बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र  एक बाजू लावून धरणाऱ्या पूनम राऊतने हरमनप्रीत कौरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत भारताचे आव्हान कायम ठेवले.  मात्र पूनम राऊत (87) आणि वेदा कृष्णमूर्ती (35) या बाद झाल्यानंतर भारताची तळाची फळी कोसळली. सहा बळी टिपणाऱ्या अॅना श्रबशोले हिने सहा बळी टिपत यजमान संघाला लढतीत पुनरागमन करून दिले. अखेर भारतीय महिला संघाला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.
 तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगाशी आला. झुलन गोस्वामी, पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या भेदक माऱ्यामुळे चांगली सलामी मिळाल्यानंतर त्याचा फायदा इंग्लिश फलंदाजांना उचलता आला नाही. लॉरेन विल्फ्रेड (24) टॅमी बेमाँट (23) आणि हेदर नाइट (1) या झटपट बाद झाल्या. त्यामुळे इंग्लिश संघावर दबाव आला. 
त्यानंतर सार टेलर (45) आणि  नताली स्कीवर (51) यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. तर तळाच्या कॅथेरिन ब्रंट (34), जेनी गन (25) आणि लॉरा मार्श (14) यांनी इंग्लंडच्या डावात उपयुक्त योगदान दिले. पण अपेक्षित धावगती राखता न आल्याने त्यांना 50 षटकात सात बाद 228 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून . झुलन गोस्वामीने 3, पूनम यादवने 2 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 बळी टिपला.