शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

स्मृती मंधानाला "सेहवाग व्हर्जन" म्हणणा-या चाहत्याला विरूने सुनावलं

By admin | Updated: July 2, 2017 12:21 IST

महिला विश्वचषक स्पर्धेत तडाखेबाज फलंदाजी करून स्मृती मंधाना नावाची एक नवी तारा उदयास आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - महिला विश्वचषक स्पर्धेत तडाखेबाज फलंदाजी करून स्मृती मंधाना नावाची एक नवी तारा उदयास आली आहे.  स्मृती मंधानाच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर सात  विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही तिने 90 धावांची शानदार खेळी केली होती. तेव्हापासून स्मृती मंधाना हे नाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. 
 
सोशल मीडियावर एका चाहत्याने स्मृती मंधानाची तुलना भारताचा माजी सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागसोबत केली. या चाहत्याने सेहवागला ट्विट करताना स्मृती मंधाना म्हणजे विरेंद्र सेहवागचं फिमेल व्हर्जन असून तुम्ही तिच्यावर गर्व करू शकतात असं म्हटलं.  त्यावर आपल्या हटके ट्विटसाठी फेमस असलेल्या सेहवागने लागलीच त्या ट्विटर युझरला अनोख्या शैलीत उत्तर दिलं. "ती स्मृतीचंच पहिलं व्हर्जन आहे. प्रत्येक भारतीय ज्याला खेळामध्ये रस आहे त्या प्रत्येकाला तिचा अभिमान वाटेल. स्मृती आणि तिच्या संघाला शुभेच्छा" असं ट्वीट सेहवागने केलं.  
 
काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने अशाच एका प्रश्नावरून पत्रकाराला खडेबोल सुनावले होते. त्यामुळे सेहवागने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 
 
काय म्हणाली होती मिताली राज- 
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या महिला वर्ल्ड कप टुर्नामेंट अभियानापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोणता पुरूष क्रिकेटपटू आवडतो असं मिताली राजला एका पत्रकाराने विचारलं. या प्रश्नावर मिताली चांगलीच भडकली. 
 
तुम्ही पुरूष क्रिकेट खेळाडूंनाही हाच प्रश्न विचारतात का? त्यांना कोणती महिला क्रिकेटपटू आवडते हे तुम्ही विचारतात का? मला सातत्याने हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही पुरूष क्रिकेटपटूंनाही हा प्रश्न विचारायला पाहिजे असं उत्तर देऊन मितालीने पत्रकाराची बोलती बंद केली.
 
पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेमध्ये बराच फरक आहे यावरही मितालीने जोर दिला.  आमचे सर्व सामने टीव्हीवर दाखवले जात नाहीत. मात्र बीसीसीआयने गेल्या दोन मालिकांचं टीव्हीवर प्रसारण करून चांगली सुरूवात केली असून त्याचा चांगला परिणामही झाला आहे. मात्र, अजून आम्हाला खरी ओळख मिळवायला वेळ लागेल,असं मिताली म्हणाली.
 
 
स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या.