नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर येथील उरी सेना मुख्यालयावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोहली आणि मुष्टियोद्धा विजेंदरसिंग यांनी नोंदवला. त्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानला आडव्या हाताने घेतले. विराट कोहलीने आपल्या संवेदना व्यक्त करताना म्हटले, की शहिंदाना श्रद्धांजली. हल्ल्याच्या छायाचित्रासह त्याने टिष्ट्वट केले. ‘आमच्याकडे शब्द नाहीत. अत्यंत दु:खद क्षण आहे. सर्व वीरांना.. जय हिंद!’ विराटसोबत विजेंदरसिंगने टिष्ट्वट करताना जवान शहीद झाल्याची बातमी दु:खद असल्याचे म्हटले. ‘उरी हल्ला हा पाकिस्तानने ‘जंग’ म्हणून केला असेल, तर आम्हीही मागे हटणार नाही.’ (वृत्तसंस्था)
विराट, विजेंदरकडून पाक हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 21, 2016 04:58 IST