शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

विराटचे ऑसींना चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: December 12, 2014 01:44 IST

ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौ:यावर कर्णधारपदाची जबाबदारी पहिल्यांदाच पार पाडणा:या विराट कोहलीने पहिल्या कसोटीच्या तिस:या दिवशी जबरदस्त खेळ केला.

 कोहलीचे शतक : भारताच्या तिस:या दिवसअखेर 5 बाद 369 धावा
अॅडिलेड : ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौ:यावर कर्णधारपदाची जबाबदारी पहिल्यांदाच पार पाडणा:या विराट कोहलीने पहिल्या कसोटीच्या तिस:या दिवशी जबरदस्त खेळ केला. या विराट खेळीने यजमान ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलेच; परंतु भारताला मजबूत स्थितीत आणले. 7 बाद 517 धावांवर डाव घोषित करून ऑसींनी भारताला कोंडीत पकडण्यासाठी रचलेला चक्रव्यूह तोडून विराटने दिवसअखेर 5 बाद 369 धावांर्पयत मजल मारून दिली. रोहित शर्मा (33) आणि वृद्धिमान सहा (1) खेळत असून, भारत आणखी 148 धावांनी पिछाडीवर आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे दुस:या दिवसाचा खेळ लवकर थांबविण्याचा निर्णय पंचानी घेतला. त्या वेळी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 517 धावांची मजल मारली होती आणि याच धावसंख्येवर त्यांनी डाव घोषित केला. तिस:या दिवसाच्या सकाळच्या सत्रत भारतीय फलंदाजांवर बाउन्सरचा मारा करून त्यांना नकोसे करून सोडायचे, असा निर्धार बांधूनच ते मैदानात उतरले. मुरली विजय आणि शिखर धवन मैदानावर आले आणि मिशेल जॉन्सनने नेहमीच्या शैलीप्रमाणो बाउन्सरचा मारा केला. पण, त्याच्या या मा:यात थोडीशी भीती प्रकर्षाने जाणवत होती. त्याचाच फायदा घेत मुरली विजय आणि धवनने धावा चोपण्यास सुरुवात केली. मात्र, आठव्या षटकात रियान हॅरिसचा आत येत असलेला चेंडू सोडण्याचा भरुदड शिखरला बसला आणि तो चेंडू यष्टीवर आदळून शिखरला तंबूत परतावे लागले. त्यानंतर विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने भारताच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. विजय भलत्याच मुडमध्ये दिसला. त्याने अधूनमधून मारलेले फटके प्रेक्षकांचीही वाहवाह मिळवून गेले. दुस:या विकेटसाठीची ही 81 धावांची भागीदारी मिशेल जॉन्ससने तोडली. जॉन्सनचा कमी उसळी घेतलेला चेंडू विजयच्या बॅटीला चाटून यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनच्या हातात अलगदपणो विसावला. 88 चेंडूंत 3 चौकार व दोन षटकार खेचून 53 धावा करणारा विजय बाद झाला. 
पुजारा मात्र खेळपट्टीवर चिटकलाच होता.  कर्णधारपदाची भूमिका पहिल्यांदाच पार पाडत असलेला विराट कोहलीच्या चेह:यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत होता; परंतु पहिल्याच चेंडूवर जॉन्ससने बाउन्सर टाकून त्याचे स्वागत केले. एक बाउन्सर तर विराटच्या हेल्मेटवर आदळला आणि स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला; जणू फिलिप हय़ुजचा क्षण त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. विराटची मस्त स्माइल पाहिल्यानंतर स्टेडियमवरील वातावरण निवळले. पुजारानेही संयमी खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 135 चेंडूंत 12 चौकार ठोकून 73 धावा करणा:या पुजाराची एकाग्रता नॅथन लिऑनने भंग केली. लिऑनने टाकलेला चेंडू डिफेन्स करण्याच्या प्रय}ात असलेल्या पुजाराच्या ग्लोजला तो आदळला आणि त्याच्या पायातून तो यष्टीच्या दिशेने सरकला.  पुजारा तो अडविण्याआधीच चेंडू यष्टीवर आदळला आणि पुजाराला तंबूत परतावे लागले. 
विराट मात्र पक्क्या निर्धाराने मैदानात उतरला होता आणि त्याने मस्त फटकेबाजी करून कर्णधार म्हणून पहिलेच कसोटी शतक ठोकले. 
दुस:या बाजूला अजिंक्य रहाणो वन डे स्टाइल खेळ करून त्याला उत्तम साथ देत होता. 81.57च्या सरासरीने रहाणोने धावा करून विराटसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पुन्हा एकदा लिऑनने ही जोडी तोडली. लिऑनने 5क्व्या षटकाच्या दुस:या चेंडूवर रहाणोच्या झेलबादचे अपील केले; परंतु चेंडू रहाणोच्या पॅडला लागल्यामुळे पंचांनी ते फेटाळले. मात्र, पुढच्याच चेंडूवर लिऑनने जलद मारा केला आणि तो चेंडू रहाणोला कळण्याआधी स्लीपला उभ्या असलेल्या शेन वॉटसनने अचूक टिपला. रहाणोने 76 चेंडूंत 1क् चौकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. 
रहाणो बाद होण्याचा धावगतीवर कोणताही परिणाम होऊ न देता विराटने जबरदस्त खेळ केला. त्याने 184 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 115 धावा चोपल्या. जॉन्सनच्या उसळत्या चेंडूंवर विराटने खूप आधी फटका मारला आणि डिप फाइनलेगला उभ्या असलेल्या रिआन हॅरिसने तो अप्रतिम झेलला. लढवय्या विराटच्या संघर्षाला येथे ब्रेक लागला. त्यानंतर रोहित शर्मा व वृद्धिमान सहाने दिवसअखेर विकेट पडू न देण्याचा यशस्वी प्रय} केला. तिस:या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 369 धावा झाल्या होत्या.
 
4कर्णधार म्हणून कसोटीत पदार्पण केल्यानंतर शतकी खेळी करणारा विराट कोहली भारताचा चौथा खेळाडू ठरला आह़े 
4विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 115 धावांची शानदार खेळी केली़ महेंद्रसिंह धोनीला दुखापत झाल्यामुळे कोहलीला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आह़े 
4कर्णधार म्हणून आपला 
पहिला सामना खेळताना 
यापूर्वी माजी दिग्गज खेळाडू 
सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि विजय हजारे यांनी शतकी खेळी करण्याचा मान मिळविला आह़े 
4कोहलीचे ते सातवे कसोटी 
शतक ठरल़े यापैकी चार शतके त्याने विदेश दौ:यात, तर तीन 
शतके मायदेशात झळकावले आहेत़ आता कसोटीत 2क्क्क् 
धावा पूर्ण करायला कोहलीला केवळ 3क् धावांची 
गरज आह़े 
 
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव 7 बाद 517 धावांवर घोषित.
भारत : मुरली विजय झे. हॅडिन गो. जॉन्सन 53, शिखर धवन त्रि. गो. हॅरिस 25, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. लिऑन 73, विराट कोहली झे. हॅरिस गो. जॉन्सन 115, अजिंक्य रहाणो झे. वॉटसन गो. लिऑन 62, रोहित शर्मा नाबाद 33, वृद्धिमान सहा नाबाद 1. अवांतर - 7; एकूण - 97 षटकांत 5 बाद 369 धावा. गोलंदाजी : जॉन्सन 18-5-9क्-2, हॅरिस 17-5-49-1, लिऑन 3क्-3-1क्3-2, सिडल 13-2-62-क्, मार्श 11-4-29-क्, वॉटसन 5-1-13-क्, स्मिथ 3-क्-19-क्.