शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीची शतकी खेळी

By admin | Updated: May 8, 2016 03:20 IST

शानदार फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने शनिवारी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे

बंगळुरू : शानदार फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने शनिवारी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट््स संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात तिसऱ्या विजयाची नोंद केली. पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे व सौरभ तिवारी यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद १९१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना बंगलोर संघाने विजयासाठी आवश्यक धावा १९.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. कोहलीने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात दुसरे शतक झळकावताना ५९ चेंडूंमध्ये नाबाद १०८ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बँगलोर संघाची सुरुवात चांगली झाली. कोहली व लोकेश राहुल यांनी सलामीला ६६ चेंडूंमध्ये ९४ धावांची भागीदारी केली. राहुलला अ‍ॅडम जाम्पाने बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. राहुलने ३५ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स (१) बाद झाल्यामुळे बँगलोरचा संघ अडचणीत आला. त्यानंतर शेन वॉटसनने कोहलीला योग्य साथ देताना १३ चेंडूंमध्ये ३६ धावा फटकावल्या. त्यात ५ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. टी-२० विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टूर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या कोहलीने आयपीएलच्या नवव्या सत्रात ८ सामन्यांत ९०.१६च्या सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. त्यात दोन शतके व चार अर्धशतकांचा समावेश आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी कोहलीनंतर सर्वाधिक धावा रहाणेच्या (१० सामने, ४१७ धावा) नावावर आहेत. त्याआधी, अजिंक्य रहाणेच्या (७४ धावा, ४८ चेंडू) अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने ६ बाद १९१ धावांची दमदार मजल मारली. धावफलकरायझिंग पुणे सुपरजायंट््स : अजिंक्य रहाणे त्रि.गो. वॉटसन ७४, उस्मान ख्वाजा धावबाद १६, सौरभ तिवारी यष्टिचित राहुल गो. चहल ५२, महेंद्रसिंह धोनी झे. रसूल गो. वॉटसन ९, तिसारा परेरा झे. वॉटसन गो. जॉर्डन १४, जॉर्ज बेली झे. राहुल गो. वॉटसन ०, रजत भाटिया नाबाद ९, आर. आश्विन नाबाद १०. अवांतर : ७. एकूण : २० षटकांत ६ बाद १९१. गोलंदाजी : जॉर्डन ४-०-४३-१, वॉटसन ४-०-२४-३, चहल ४-०-३८-१.रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली नाबाद १०८, के. एल. राहुल झे. बेली गो. जाम्पा ३८, एबी डिव्हिलियर्स झे. परेरा गो. जाम्पा १, शेन वॉटसन पायचित गो. आर. पी. सिंग ३६, ट्रॅव्हिस हेड नाबाद ६. अवांतर : ६. एकूण : १९.३ षटकांत ३ बाद १९५. गोलंदाजी : आर. पी. सिंह ४-०-३७-१, जाम्पा ४-०-३५-२.