शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीचे आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा - स्मिथ

By admin | Updated: March 15, 2017 18:27 IST

वारंवार फसवणूक केल्याच्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 15 - डीआरएसचा कौल घेताना वारंवार फसवणूक केल्याच्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने केला आहे. कोहलीचा आरोप म्हणजे मूर्खपणा असल्याचे स्मिथने म्हटले आहे. दुस-या बंगळुरु कसोटीत पंचांनी बाद ठरवल्यानंतर स्मिथ डीआरएसच्या आधारे पंचांच्या निर्णया विरोधात दाद मागण्यासाठी ड्रेसिंगरुमकडे विचारणा करताना दिसला होता. 
 
सामना संपल्यानंतर विराटने स्मिथच्या या कृतीवर जोरदार टीका केली. माझ्या दृष्टीकोनातून विराटने केलेले आरोप चुकीचे आहेत. सामना संपल्यानंतर मी माझी चूक मान्य केली होती. अशा प्रकारे ड्रेसिंगरुमकडे पाहून विचारणे माझी चूक होती असे स्मिथ सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत म्हणाला. मी वारंवार डीआरएससाठी ड्रेसिंगरुमकडे पाहून विचारणा करत होतो. हा आरोपच मूर्खपणाचा आहे.  विराटने चुकीचे स्टेटमेंट केले आहे असे स्मिथ म्हणाला. 
 
आणखी वाचा 
 
आज पत्रकारांशी वार्तालाप करताना विराटने कटू आठवणी मागे सोडून पुढे जाणार असल्याचे सांगितले पण ऑस्ट्रेलियन कर्णधारावर केलेल्या आरोपांबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे कोहलीने सांगितले. दुस-या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. पण आयसीसीने कोणावरही कारवाई केली नाही. मी सामनाधिकार रिची रिचर्डसन आणि अन्य पंचांसोबत चर्चा केली. 
 
कसोटी मालिकेत क्रिकेट जिंकणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. दोन्ही संघांना नियमांच्या चौकटीत राहून खेळण्याचा सल्ला दिला आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका नेहमी कडवेपणाने खेळल्या जातात असे स्मिथ म्हणाला. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या  ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले मंकीगेट प्रकरण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहे. दुस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या वापरावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केलेल्या गंभीर आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे.