शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने गाजविले वर्ष

By admin | Updated: December 27, 2015 02:35 IST

भारतीय क्रिकेट संघाला २0१५मध्ये चढ-उताराचा सामना करावा लागला, महेंद्रसिंह धोनी नावाचा सूर्य मावळतीकडे झुकत चालला असताना, विराट कोहलीने आपले नेतृत्वगुण प्रथमदर्शीतरी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला २0१५मध्ये चढ-उताराचा सामना करावा लागला, महेंद्रसिंह धोनी नावाचा सूर्य मावळतीकडे झुकत चालला असताना, विराट कोहलीने आपले नेतृत्वगुण प्रथमदर्शीतरी सिद्ध केल्याचे दिसत आहे. धोनीकडून त्याला कर्णधारपदाची सूत्रे मिळाल्यानंतर, कोहलीने श्रीलंकेत आणि मायदेशात कसोटी मालिका जिंकून दिली. दरम्यान, जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयची सूत्रे आली आहेत. बीसीसीआयमधील ‘स्वच्छता मोहीम’ हाही यंदा चर्चेचा विषय ठरली आहे.भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर अचानक निवृत्ती पत्करली. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिल्लीच्या विराट कोहलीच्या खांद्यावर आली. पहिल्या टप्प्यात तरी तो या कसोटीवर पास झाल्याचे दिसत आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत खेळपट्टीबद्दलची चर्चा चांगलीच रंगली. मोहाली आणि नागपूर येथील सामने तिसऱ्याच दिवशी संपले. या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेची अक्षरश: शिकार केली. याबद्दल नागपूर स्टेडीयमला आयसीसीकडून ‘अधिकृत समज’ही देण्यात आली आहे.रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी या मालिकेत सुपर हिट ठरली. परंतु, भारतीय जलदगती गोलंदाज प्रभाव टाकू शकले नाहीत. इशांत शर्मा काही अंशी यशस्वी ठरला, परंतु त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते. वर्ल्डकपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचविण्यास महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा मोहम्मद शमी जवळ जवळ वर्षभर मैदानाबाहेरच राहिला. विश्वचषकाचा मुकुट पुन्हा आपल्याकडेच ठेवण्याच्या इराद्याने धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत सुसाट धडक मारली, पण तेथे आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे त्यांचा फायनलचा मार्ग बंद झाला. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाने न्यूझीलंडला हरवून पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकपनंतर मायकेल क्लार्क, मिशेल जॉनसन, डॅनिएल व्हिट्टोरी यांनी निवृत्तीची घोषणा केली. (वृत्तसंस्था)कोहलीने श्रीलंका दौऱ्यात कसोटी कर्णधार म्हणून पहिल्यांदा पूर्णवेळ जबाबदारी सांभाळली. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळविला. श्रीलंकन भूमीवर भारताने २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशात कसोटीतील नंबर वन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ३-0 ने जिंकून इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा परदेशात हा ९ वर्षांनंतर पहिला मालिका पराभव ठरला.