शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली अग्रस्थानी कायम

By admin | Updated: August 30, 2016 20:57 IST

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या

आयसीसी टी२० : अश्विनचे टॉप फाइव्हमध्ये पुनरागमन

दुबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ५ स्थानांमध्ये पुनरागमन केले आहे. त्याची तीन स्थानांनी प्रगती झाली असून ताज्या क्रमवारीनुसार अश्विन चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.वेस्ट इंडिजयविरुध्द अमेरिकेतील लॉडरहिल येथे झालेल्या दोन सामन्यांच्या टी२० मालिकेत नाबाद शतक झळकावणारा लोकेश राहुलने तब्बल ६७ क्रमांकानी मोठी झेप घेत ३१वे स्थान पटकावले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विक्रमी ४८९ धावा काढल्या गेल्या. यामध्ये राहुलने नाबाद ११० धावांची घणाघाती खेळी केली होती. विंडिजने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या आणि या धावांचा पाठलाग करताना भारताला २४४ धावांवर समाधान मानावे लागले होते.त्याचवेळी दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर विंडिजने ही मालिका १-० अशी जिंकली. या विजयासह विंडिज संघाने आयसीसी टी२० क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या भारत आणि आपल्या गुणांमध्ये केवळ एका गुणाचे अंतर ठेवले आहे. दोन वेळचा टी२० जगज्जेत्ता वेस्ट इंडिज संघ या मालिकेआधी १२८ गुणांसह दुसºया स्थानी असलेल्या भारताहून सहा गुणांनी मागे होता. आता वेस्ट इंडिजचे १२५ गुण असून भारताचे गुण १२६ झाले आहेत. न्यूझीलंड सर्वाधिक १३२ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. (वृत्तसंस्था)