हैदराबाद : नुकत्याच आॅस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांदरम्यान झालेल्या वादविवादानंतरही विराट कोहली माझा चांगला मित्र असल्याचे डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. भारतीय कर्णधार कोहलीने आॅस्ट्रेलियन खेळाडू आता मित्र राहिले नसल्याचे म्हटले होते. आयपीएल उद्घाटन समारंभात वॉर्नरने कोहलीसोबत गप्पा मारल्या. वॉर्नरने आपल्या संघाच्या विजयाबाबत आनंद व्यक्त केला. सनरायजर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ३५ धावांनी पराभूत केले होते.होय, मी विराटशी बोललो. आम्ही अजूनही मित्र आहोत. दोघांनी एकमेकांसोबत एसएमएसद्वारे गप्पा मारल्या. आम्ही आमच्या कामात व्यस्त असतो. पत्रकार योग्य किंवा अयोग्य यावर लिहीत असतात. आम्ही खेळाडू आहोत, अशाच पद्धतीने खेळ चालतो. याशिवाय आम्ही चांगले मित्र आहोत. - डेव्हिड वॉर्नर
विराट मित्रच : वॉर्नर
By admin | Updated: April 8, 2017 00:53 IST