शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

"विराट" बंगळुरूचा 49 धावांत खुर्दा, कोलकाताचा "रॉयल" विजय

By admin | Updated: April 24, 2017 07:10 IST

कोलकाता नाइट रायडर्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा अवघ्या ४९ धावांत खुर्दा पाडून ८२ धावांनी बाजी मारली

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 -  फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा अवघ्या ४९ धावांत खुर्दा पाडून ८२ धावांनी बाजी मारली. या शानदार विजयासह कोलकाताने १० गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान भक्कम केले. 

इडन गार्डनवर झालेल्या या सामन्याला कमालीची कलाटणी मिळाली. आधी आरसीबीच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना केकेआरला घरच्या मैदानावर १३१ धावांवर रोखले. यावेळी आरसीबी सहज बाजी मारणार अशीच शक्यता होती. कर्णधार विराट कोहली, धोकादायक ख्रिस गेल आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स अशी जबरदस्त फलंदाजी असलेल्या आरसीबीला हे आव्हान अजिबात कठिण नव्हते. शिवाय केदार जाधव, मनदीप सिंग, स्टुअर्ट बिन्नी असे शिलेदारही केकेआरला चोपण्यास सज्ज होते. परंतु, केकेआरने जबरदस्त मारा करताना सामनाच पलटवला. 

ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात कोहलीला बाद करुन बँगलोरला मोठा धक्का दिला. या पहिल्याच मजबूत धक्क्याने जणूकाही बँँगलोरच्या आत्मविश्वासालाच तडा गेला आणि एकामागून एक फलंदाज बाद व्हायला लागले. बघता बघता अवघ्या ४९ धावांमध्ये संपुर्ण संघ तंबूत परतला आणि एकवेळ पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या केकेआरने अनपेक्षित बाजी मारली. नॅथन कुल्टर-नाइल, वोक्स आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले. उमेश यादवने एक बळी घेतला. विशेष म्हणजे बँगलोरच्या एकाही फलंदाजा दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. केदार जाधवने सर्वाधिक ९ धावा काढल्या. तत्पूर्वी, सुनील नरेनने पुन्हा एकदा सलामीला येत अपेक्षित आक्रमक सुरुवात करताना बँगलोरच्या गोलंदाजीची पिसे काढण्यास सुरुवात केली. त्याने सॅम्युअल बद्री टाकत असलेल्या पहिल्या षटकात १८ धावा चोपताना कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु, टायमल मिल्सने गंभीरला बाद करुन कोलकाताला पहिला धक्का दिला. तरीही नरेनमुळे कोलकाताची धावसंख्या वेगाने वाढत होती. स्टुअर्ट बिन्नीने नरेनला बाद करुन बँगलोरची धुलाई थांबवली. नरेनने १७ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ३४ धावा कुटल्या. यानंतर रॉबिन उथप्पा (११) व युसुफ पठाण (८) स्वस्तात परतल्याने कोलकाताच्या धावांचा वेग मंदावला. यजुवेंद्र चहलने ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

आरसीबीने यावेळी आयपीएल इतिहासातील सर्वात नीचांकी ४९ धावसंख्येची नोंद केली. यापूर्वी २०१४ मध्ये अबूधाबी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबीच्या ७० धावा झाल्या होत्या.आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकाच सामन्यात २० फलंदाज बाद होण्याची ही दुसरी वेळी आहे.एकूण १० आयपीएलमध्ये विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि दोन्ही सामने आरसीबीने गमावले होते.बंगळुरू येथे १८ एप्रिल २००८ रोजी केकेआरने आरसीबी संघाचा ८२ धावांत खुर्दा केला होता.सुनील नरेनने ३४ धावांची केलेली महत्त्वपूर्ण खेळी निर्णायक ठरली.आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.यापूर्वीची नीचांकी धावसंख्या राजस्थान रॉयल्सची आरसीबीविरुद्ध ५८ धावांची होती.

योगायोगआरसीबीने आयपीएलच्या इतिहासात २३ एप्रिल २०१३ रोजी ५ बाद २६३ अशी सर्वाेच्च धावसंख्या केली होती. 23 एप्रिल २०१७ ला आरसीबीची ४९ नीचांकी धावसंख्या नोंदवली गेली. संक्षिप्त धावफलककोलकाता नाइट रायडर्स : १९.३ षटकात सर्वबाद १३१ धावा (सुनील नरेन ३४, ख्रिस वोक्स १८; यजुवेंद्र चहल ३/१६) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : ९.४ षटकात सर्वबाद ४९ धावा (केदार जाधव ९; कॉलिन डी ग्रँडहोम ३/४, ख्रिस वोक्स ३/६, नॅथन कुल्टर-नाइल ३/२१)