शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट’ वाद; कुंबळेला विरोध करणाऱ्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवा

By admin | Updated: June 22, 2017 06:08 IST

अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्याच्या बाजूने काही माजी क्रिकेटपटू उभे राहिले आहेत.

मुंबई : अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्याच्या बाजूने काही माजी क्रिकेटपटू उभे राहिले आहेत. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी तर विराट कोहलीचे नाव न घेता अनेक टोले लगावले. ‘जे खेळाडू तक्रार करताहेत, त्यांनाच संघातून घरचा रस्ता दाखवा,’ असेही गावस्कर यांनी म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्याशी नरमाईने वागणारा प्रशिक्षक हवा आहे का? तुम्हाला आज बरे वाटत नाही, मग सराव करू नका, सुट्टी घ्या. शॉपिंगला जा. असे म्हणणारा प्रशिक्षक हवा असेल तर, अनिल कुंबळे त्यामध्ये फीट बसत नाही, असा टोला गावसकर यांनी लगावला. कुंबळेने मागच्या वर्षभरात संघाला जे मिळवून दिलेय ते असामान्य आहे. कुंबळेनंतर येणाऱ्या नव्या प्रशिक्षकाला आपण काय संदेश देणार आहोत? एकतर खेळाडूंच्या विचारांशी जुळवून घे किंवा कुंबळेसारखा असशील तर पायउतार हो. हे खूपच वाईट असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे. दोन किंवा तीन पेक्षा जास्त लोक असतील तर मतभेद असतात. कुंबळे यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारताने अनेक विजय मिळवले. वर्षभरात कुंबळेने काही चुकीचे केल्याचे मला वाटत नाही, असे गावसकर म्हणाले.

- वर्षभर टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचे श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या स्टाईलवर आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहाण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचे पहिल्यांदाच समजले. मला धक्का बसला आहे. बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला असे वाटते की, आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. - अनिल कुंबळे

- बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. - राजीव शुक्ला, वरिष्ठ अधिकारी, बीसीसीआय