बिश्केक (किर्गिस्तान) : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानवे लागले. अंतिम फेरीत विनेश चीनच्या चुन लेईकडून पराभूत झाली.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या विनेशला चीनच्या चुन लेईने २-३ गुणांनी पराभूत केले. स्पर्धेतील इतर लढतींमध्ये ५९ किलोगटात भारताच्या संगीताने कोरियाच्या जियून उमला पराभूत करून कांस्यपदक आपल्या नावावर केले. या स्पर्धेत भारतीय महिलांनी एकूण ४ पदके संपादन केली. ग्रीको रोमन प्रकारात त्यांनी २ कांस्यपदके जिंकली. ६८ किलोगटात भारताच्या दिव्या काकरानने किर्गिस्तानच्या मेरीम जुमनारोव्हला नमवून कांस्यपदक संपादन केले.
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजन गटात विनेश फोगाटला रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:40 IST