शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमादित्यची विजयी कूच

By admin | Updated: November 19, 2015 00:56 IST

अग्रमानांकीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी याच्यासह स्पर्धेतील इतर मानांकीत खेळाडूंनी देखील सहज विजय मिळवताना फीडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत

मुंबई : अग्रमानांकीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी याच्यासह स्पर्धेतील इतर मानांकीत खेळाडूंनी देखील सहज विजय मिळवताना फीडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली.ुबोरीवली येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत राज्यातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे एकूण दिड लाख रुपयांच्या बक्षिसांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या लढती रंगणार आहेत.२३०३ इलो रेट असलेल्या अनुभवी विक्रमादित्यने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मुंबईच्या अनन्या वोराचा (१०४१) सहज पराभव केला. गॅम्बीट पध्दतीने सुरुवात करताना विक्रमादित्यने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचून अनन्याला हतबल केले. त्याच्या आक्रमक व्यूहरचनेसमोर अनन्याने सपशेल हार पत्करली. दुसऱ्या बाजूला पुण्याच्या श्रीनाथ राव यानेही आक्रमक खेळ करताना मुंबईकर हनेल कामदारचा केवळ २४ चालींमध्ये पाडाव केला. काळ्या मोहऱ्यांनी फ्रेंच बचावपध्दतीने सुरुवात करुन त्याने कामदारला चांगलेच जाळ्यात ओढले.अन्य एका लढतीत राष्ट्रीय ‘ब’ स्पर्धा विजेत्या फिडे मास्टर अविनाश आवटे (इलो २१३५) याने दणदणीत विजय मिळवताना जीनय मेहताचा (इलो १०२३) सहजपणे धुव्वा उडवला. एकूण १० फेऱ्यांच्या या स्पर्धेत ३१४ खेळाडूंचा समावेश आहे.अन्य निकालअमरदीप एस.(१) वि.वि. तपन जोशी (०); केतन बोरीचा (१) वि.वि. ओम सरोदे (०); एम. एन. अभ्यंकर (१) वि.वि. गौरव मेहता (०); शुभम कुमठेकर (१) वि.वि. श्रावणी पाटील (०); राजाबाबू गजेंगी (१) वि.वि. देवदत्त पटेल (०); वेदांत पानेसर (१) वि.वि. आरव भट्टाचार्य (०).