लिओन (स्पेन) : पाच वेळचा विश्व चॅम्पियन भारताच्या विश्वनाथन आनंदने येथे सुरू असलेल्या मास्टर्स स्पर्धेत विक्रमी नवव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले. सुपरग्रॅण्ड मास्टर्स आनंदने चीनच्या ग्रॅण्डमास्टर्स वेई यी कोला अंतिम फेरीत पराभूत केले. ४६ वर्षीय आनंदने अंतिम फेरीत पहिली बाजी मारल्यानंतर पुढील ३ डाव अनिर्णित राखले आणि २.५-१.५ असे विजेतेपद आपल्या नावावर केले. आनंदने यापूर्वी १९९६-९९-२०००,०१,०५,०६,०७ आणि २०११ मध्ये हे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. (वृत्तसंस्था)
आनंदचे मास्टर्स स्पर्धेत विक्रमी नववे जेतेपद
By admin | Updated: June 15, 2016 05:19 IST