शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकास कृष्णनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Updated: May 2, 2017 01:23 IST

भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) आणि गौरव विधूडी (५६ किलो) यांनी आपआपल्या गटात चमकदार

ताश्कंद : भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) आणि गौरव विधूडी (५६ किलो) यांनी आपआपल्या गटात चमकदार कामगिरी करताना सोमवारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच, अमित फंगलनेही (४९ किलो) आपल्या गटातून आगेकूच केली. अत्यंत एकतर्फी झालेल्या लढतीत विकासने आपला जलवा दाखवताना अवघ्या २ मिनिटांमध्ये थायलंडच्या पाथोमसाक कुटिया याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. कुटिया याच्या डावा डोळ्याच्या वरच्या भागावर जखम झाल्याने दोन वेळा लढत थांबवावी लागली आणि शेवटी पंचांनी विकास कृष्णनला विजयी घोषित केले. विकासच्या जोरदार ठोश्यांपुढे कुटियाचा काहीच निभाव लागला नाही. आता स्पर्धेतील अव्वल आठ खेळाडूंच्या फेरीमध्ये विकासचा सामना इंडोनेशियाच्या बेताउबुन ब्रमाविरुध्द होईल. दुसरीकडे, गौरवने थायलंडच्याच युतापोंग टोंगडीला लोळवले. पुढील फेरीत गौरवपुढे चीनचा द्वितीय मानांकीत जियावी हांग याचे तगडे आव्हान असेल. त्याचवेळी, आशियाई युवा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या आशिष कुमारला (६४ किलो) उझबेकिस्तानच्या इकबोलजान खोलदारोवविरुध्द पराभव पत्करावा लागला. अमितने सहज आगेकूच करताना अफगाणिस्तानच्या रामिश रहिमला नमवले. (वृत्तसंस्था)