शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदरचा विजयाचा चौकार

By admin | Updated: March 13, 2016 23:25 IST

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सध्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या विजेंदर कुमारला लोळवण्याबाबत बढाया मारणाऱ्या हंगेरीच्या अ‍ॅलेक्सजेंडर होरवाथचा फुगा फुटला.

लिव्हरपूल : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सध्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या विजेंदर कुमारला लोळवण्याबाबत बढाया मारणाऱ्या हंगेरीच्या अ‍ॅलेक्सजेंडर होरवाथचा फुगा फुटला. एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताच्या विजेंदरने तिसऱ्या फेरीतच होरवाथला त्याची जागा दाखवली आणि व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सलग चौथ्या विजयाची दिमाखात नोंद केली. विशेष म्हणजे या लढतीआधी आपण विजेंदरला हरवण्यासाठी सापाचे रक्त पिऊन ताकद वाढवत असल्याचे होरवाथने जाहीर केले होते; मात्र विजेंदरने देशी घी आणि दुधाची ताकद दाखवून दमदार ‘पंच’ मारले.याआधी विजेंदरने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील तिन्ही विजय दोन फेऱ्यांत मिळवले होते. मात्र या वेळी तिसऱ्या फेरीत विजेंदरने होरवाथला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आॅलिंपिक कांस्यविजेत्या विजेंदरच्या दमदार व ताकदवर ठोशांनी होरवाथ तिसऱ्या फेरीत गुडघ्यांवर बसला. यानंतर पंचांनी लढत थांबवून विजेंदरला विजयी घोषित केले. पहिल्या फेरीपासूनच विजेंदरने वर्चस्व राखताना होरवाथला बॅकफूटवर नेले होते. होरवाथने यापूर्वी ७ सामन्यांपैकी ५ लढती जिंकल्या होत्या. लढतीला सुरुवात झाल्यानंतरच विजेता कोण होणार, हे स्पष्ट झाले होते. विजेंदरने होरवाथचा अंदाज घेतल्यानंतर मोक्याच्या वेळी डाव्या हाताने तीन - चार जबरदस्त ठोसे मारले. यामुळे दोन वेळा होरवाथच्या दातांचे प्लॅस्टिक आवरण निघाले. पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या फेरीतही विजेंदरने होरवाथला संधी दिली नाही.अंतिम फेरीत विजेंदरने जबरदस्त आक्रमक पवित्रा घेत होरवाथला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. तिसऱ्या फेरीच्या पहिल्या मिनिटालाच होरवाथ गुडघ्यांवर बसला. यानंतर पंचांनी काऊंटिंग सुरू करून लढत रोखून विजेंदरला विजयी घोषित केले. (वृत्तसंस्था)