नवी दिल्ली : ‘मला आव्हान देण्याआधी विजेंदरसिंग याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पुरेसा अनुभव प्राप्त करून घ्यावा. थेट मला आव्हान देण्याचा बालिशपणा त्याने करू नये. त्याने दिलेले आव्हान गंमत करण्यासारखे आहे. मी त्याच्यासोबत खेळलो तर त्याची कारकीर्द संपविण्याइतपत धडा शिकवू शकतो,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानी मूळ असलेला ब्रिटिश बॉक्सर आमीर खान याने केली.विजेंदर व्यावसायिक बॉक्सिंगध्ये उतरल्यापासून सलग ७ लढती जिंकला. त्याने आता आमीरशी २ हात करण्याचे लक्ष्य आखले आहे. यावर एका वाहिनीला प्रतिक्रिया आमीर म्हणाला, ‘विजेंदरचे चॅलेंज मला गमतीदार वाटले. मी त्याचे करिअर संपवू शकतो.’ २ वेळा विश्वचॅम्पियन राहिलेल्या २९ वर्षांच्या आमीरच्या मनगटाची नुकतीच शस्त्रक्रिया झाली. (वृत्तसंस्था)नुकताच आशिया मिडलवेट चॅम्पियन विजेता बनलेल्या विजेंदरला आमीरने सल्ला दिला आहे. तो म्हणतो, ‘माझ्यासारख्याला आव्हान देण्याआधी विजेंदरने आपला अनुभव वाढवावा. मी विजेंदरसोबत नक्कीच खेळणार; पण आधी त्याला अनुभव मिळवू द्या.’
...तर विजेंदरचे करिअर उद्ध्वस्त होईल : आमीर
By admin | Updated: July 22, 2016 05:28 IST