शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- राहुलचे अर्धशतक, भारताचे इंग्लंडसमोर 145 धावांचे आव्हान

By admin | Updated: January 29, 2017 23:17 IST

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 29 -  इंग्लिश गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कानपूरनंतर नागपुरातही भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे  लोकेश राहुलच्या शानदार ...

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 -  इंग्लिश गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कानपूरनंतर नागपुरातही भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे  लोकेश राहुलच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतरही इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारताला दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत 8 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताला इंग्लंडसमोर विजयासाठी 145  धावांचेच आव्हान ठेवता आले.  भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या.  
तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. 
त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले. पण अखेरच्या षटकांमध्ये इंग्लिश गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा केला. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फटकेबाजीसाठी मोकळीक मिळाली नाही. त्यामुळे भारताचा डाव 20 षटकांमध्ये 8 बाद 144 धावांपर्यंतच पोहोचला. 
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची गर्दी 
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याच्या निमित्ताने जामठा स्टेडियमवर उसळली क्रिकेट रसिकांची गर्दी पाहून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेकांना तिकीट न मिळालेल्या क्रीडा प्रेमींनी  मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळासाठी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जामठा स्टेडियमकडे एकाच वेळी हजारो क्रिकेट रसिक वर्धा मार्गांवरून दाखल झाले होते.
https://www.dailymotion.com/video/x844q5i