शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - ख्रिस गेलने विराटचे केले "हटके" स्वागत

By admin | Updated: April 4, 2017 12:27 IST

धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच आपला वेस्ट इंडियन क्रिकेटशैलीतला मोकळेपणा, बिनधास्तपणा जपला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. 4 - धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच आपला वेस्ट इंडियन क्रिकेटशैलीतला मोकळेपणा, बिनधास्तपणा जपला आहे. सामना जिंकल्यानंतर भर मैदानात किंवा एखाद्या पार्टीमध्ये बिनधास्त नृत्य करणा-या गेलला आपण अनेकदा पाहिले आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधीत्व करणा-या गेलने संघसहकारी विराट कोहलीचे  सुद्धा अशाच स्टायलिश पद्धतीने स्वागत केले. 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनोख्या पद्धतीने स्वागत करणा-या गेलचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विराट आरसीबीच्या संघात दाखल झाला असला तरी, सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना "विराट" फटकेबाजीला मुकावे लागेल असे दिसते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती. 
 
अजूनही तो या दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने त्याला ड्रेसिंगरुममध्ये बसून पहावे लागू शकतात. विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन कर्णधारपदाची जबाबदारी संभाळेल. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्सही पाठिच्या दुखापतीने त्रस्त असल्याने वॉटसनही कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. 
 
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 9 मोसमात आरसीबीला एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. पण नेहमीच त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध बंगळुरुचा पहिला सामना होणार आहे. 
{{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BSYpmmODeXP/"}}}}