शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

ऑक्सफर्ड मरिन, गावणे स्ट्रायकर्सचे विजय

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

रॉयल टी-२० क्रिकेट : नित्यानंद, लाईटनिंग स्टार्झचा पराभव

रॉयल टी-२० क्रिकेट : नित्यानंद, लाईटनिंग स्टार्झचा पराभव
पणजी : वेलिंग क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या रॉयल टी-२० सिझनबॉल क्रिकेट स्पर्धेत ऑक्सफर्ड मरिन आणि गावणे स्ट्रायकर्स यांनी विजय नोंदवले. त्यांनी अनुक्रमे नित्यानंद स्पोर्ट्स क्लब आणि लाईटनिंग स्टार्झचा पराभव केला. ऑक्सफर्डचा संकल्प पेडणेकर व गावणे स्ट्रायकर्सचा सिद्धेश नाईक सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात ऑक्सफर्ड मरिन संघाने १९ षटकांत सर्वबाद १३८ धावा केल्या. त्यांच्या दामोदर भटने ४३ तर सनी काणेकरने २२ धावांचे योगदान दिले. नित्यानंदकडून टेक बहादूर आणि शिशिर दिवकर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, नित्यानंद स्पोर्ट्स क्लब १९.१ षटकांत १२२ धावांवर गारद झाला. त्यांच्या प्रमोद नाईकने सर्वाधिक ३४ धावा केल्या. वैभव कडकडेने १९ धावांचे योगदान दिले. ऑक्सफर्डकडून संकल्प पेडणेकरने ३ तर मुक्तार काद्रीने २ गडी बाद केले. हा सामना ऑक्सफर्डने १६ धावांनी जिंकला.
दुसर्‍या सामन्यात, गावणे स्ट्रायकर्सने १९.४ षटकांत सर्वबाद १५५ धावा केल्या. यामध्ये सिद्धेश नाईकने अर्धशतक (५२) झळकावले. सुशांत गोवेकरने २० धावांचे योगदान दिले. लाईटनिंग स्टार्झकडून परशुराम आणि साहिल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, लाईटनिंग स्टार्झ संघाने २० षटकांत ९ बाद १२६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांच्या उमराज आणि राजेश जोशी यांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. गावणे संघाकडून रघुवीर लोटलीकरने ३ तर सिद्धू वेरेकरने २ गडी बाद केले. हा सामना गावणे स्ट्रायकर्सने २९ धावांनी जिंकला.(क्रीडा प्रतिनिधी)