गुजरातचा विजय
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
अहमदाबाद : गुजरातने हरियाणाला दुसर्या डावात स्वस्तात गारद करीत रणजी सामन्याच्या दुसर्या दिवशी ११५ धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करीत ९ विकेटने विजय मिळवला़ गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (*६२) आणि चिराग गांधी (*४२) यांनी विजय मिळवून दिला़ हिमाचलचा धाव डोंगरहैदराबाद : कर्णधार बिपुल शर्मा (१७६) याच्या शानदार खेळीच्या जोरावर हिमाचलप्रदेशने हैदराबादविरुद्ध ...
गुजरातचा विजय
अहमदाबाद : गुजरातने हरियाणाला दुसर्या डावात स्वस्तात गारद करीत रणजी सामन्याच्या दुसर्या दिवशी ११५ धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करीत ९ विकेटने विजय मिळवला़ गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (*६२) आणि चिराग गांधी (*४२) यांनी विजय मिळवून दिला़ हिमाचलचा धाव डोंगरहैदराबाद : कर्णधार बिपुल शर्मा (१७६) याच्या शानदार खेळीच्या जोरावर हिमाचलप्रदेशने हैदराबादविरुद्ध दुसर्या दिवशी ५११ धावांचे विशाल स्कोअर उभे केले़ शर्माने पारस डोगरा (१३७) याच्यासोबत सहाव्या गड्यासाठी २४९ धावा जोडल्या़मंगलोरकरचे सात बळीबडोदरा: वेगवान गोलंदाज सागर मंगलोरकरच्या सात बळींच्या जोरावर बडोद्याने रणजी सामन्याच्या दुसर्या दिवशी तामिळनाडूला १८८ धावात गारद केले़ बडोद्याने पहिल्या डावात १४९ केल्या होत्या़ तर दुसर्या डावात बडोद्याने ३ बाद ७३ धावा केल्या आहेत़