शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील कर्मचारी, अधिकार्‍यांसाठी चालण्याची स्पर्धा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा शेवट बुद्ध लेणीवर होईल. स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पूर्णचंद्र लामघरे, सदस्य डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ज्योती इरावने, डॉ. एम. एस. बेग, यशवंत कांबळे, विलास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा शेवट बुद्ध लेणीवर होईल. स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पूर्णचंद्र लामघरे, सदस्य डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ज्योती इरावने, डॉ. एम. एस. बेग, यशवंत कांबळे, विलास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
निरोगी जीवन जगण्यासाठी हलका व्यायाम आणि सकाळच्या स्वच्छ हवेत चालणे महत्त्वाचे आहे. हा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी ४0 वर्षांखालील, ५0 वर्षांखालील व ५१ वर्षांवरील असे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकावर येणार्‍यास पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी होणार्‍यांनी सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पुरुष आणि महिला यांचे स्वतंत्र गट आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दयानंद कांबळे, जयराज देशपांडे असणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. खालेद बदाम, शेळके, आर.ए. पवार, बी.जी. मगरे, एस.आर. जामगे, दलसिंग सलामपुरे आदी परिश्रम घेत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)