शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

उत्तर प्रदेश-विदर्भ

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

उत्तर प्रदेशचे वर्चस्व

उत्तर प्रदेशचे वर्चस्व
सी.के. नायडू क्रिकेट : विदर्भ बॅकफूटवर
नागपूर : कानपूर येथे कमला क्लब मैदानावर खेळल्या जात असलेल्या २३ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या कर्नल सी.के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या डावात ५३१ धावांची आघाडी घेत उत्तर प्रदेश संघाने विदर्भाला बॅकफूटवर ढकलण्याची कामगिरी चोख बजावली. गुरुवारी खेळ थांबला त्यावेळी उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात ४ बाद ४३२ धावांची दमदार मजल मारली होती. उत्तर प्रदेशकडे ५३१ धावांची आघाडी असून त्यांच्या ४ विकेट शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशचा सलामीवीर अल्मास शौकतने नाबाद १८१ धावांची खेळी करीत विदर्भाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शौकतच्या खेळीत २५ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. अल्मास व कालचा नाबाद फलंदाज हिमांशू अस्नोरा (८२ धावा, २०५ चेंडू, १० चौकार, १ षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. अखेर अक्षय कर्णेवारने अस्नोराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मोहम्मद सैफ (६५ धावा, ४१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) याने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने अल्माससोबत पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. झाहीद अली याने ३३ धावांचे योगदान दिले. गुरुवारी खेळ थांबला त्यावेळी शतकवीर शौकतला कुलदीप यादव (२३) साथ देत होता. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
उत्तर प्रदेश पहिला डाव २६८. विदर्भ पहिला डाव १६९.
उत्तर प्रदेश दुसरा डाव (कालच्या ३ बाद ८१ धावसंख्येवरून पुढे :- अल्मास शौकत खेळत आहे १८९, हिमांशू अस्नोरा झे. वाडकर गो. कर्णेवार ८२, मोहम्मद सैफ झे. शर्मा गो. चौधरी ६५, झाहीद अली झे. शर्मा गो. गुरबानी ३३, कुलदीप यादव खेळत आहे २५. अवांतर (२१). एकूण ११७ षटकांत ६ बाद ४३२. बाद क्रम : १-५४, २-६१, ३-६५, ४-२३८, ५-३३३, ६-३८४. गोलंदाजी : सिद्धेश नेरळ १०-४-३९-०, एस. बिंगेवार ११-१-४६-०, राज चौधरी २८-७-११९-३, कर्णेवार २२-४-६८-१, जितू शर्मा २४-५-७५-१, तुषार कडू ८-१-३९-०, आर.एन. गुरबानी १३-३-२५-१, अपूर्व वानखेडे १-०-५-०.