ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ५ - यूएस ओपन स्पर्धा दोन वेळा जिंकण्याचा मान पटकावणा-या स्पेनचा खेळाडू राफेल नदालला यावर्षी मात्र तिस-या फेरीतच पराभवाचा धक्का बसला अाहे. इटलीच्या फॉगिनीने नदालला तिस-या फेरीतच पराभूत केल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. पाच सेट्सपर्यंत चाललेल्या सामन्यात फॉगिनीने नदालचा ३-६, ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला.
नदालने पहिले दोन सेट जिंकल्यानंतर फॉगिनीने तिस-या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत नदालला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. फॉगिनीने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये असणा-या खेळाडूला पराभूत केले आहे.
नदालला २००५ सालानंतर यावेळी पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल १० वर्षांनी अमेरिकन ओपमनध्ये तिस-या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.