शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाला निलंबित करण्याचा आग्रह

By admin | Updated: November 10, 2015 23:13 IST

विश्व डोपिंगविरोधी एजन्सीच्या (वाडा) स्वतंत्र आयोगाने आपल्या एका अहवालात रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघावर २०१६ च्या आॅलिम्पिक खेळासह सर्वंच स्पर्धांसाठी निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली आहे.

जिनिव्हा : विश्व डोपिंगविरोधी एजन्सीच्या (वाडा) स्वतंत्र आयोगाने आपल्या एका अहवालात रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघावर २०१६ च्या आॅलिम्पिक खेळासह सर्वंच स्पर्धांसाठी निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली आहे. या अहवालामध्ये रशियन सरकारच्या संगनमताने अ‍ॅथलेटिक्स महासंघ फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅथलिट््सची डोपिंग चाचणी होत असलेली रशियातील प्रयोगशाळा विश्वासपात्र नाही, असेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तीन सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाचे अध्यक्ष वाडाचे माजी प्रमुख रिचर्ड पाऊंड यांनी म्हटले, आहे की आम्ही विचार केला त्यापेक्षा येथील परिस्थिती चिंताजनक आहे.समितीने विश्व अ‍ॅथलेटिक्स संघटनेला (आयएएएफ) रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघावर निलंबनाची कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. त्याचसोबत रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाला डोपिंगच्या नियमांचे पालन न करणारा महासंघ म्हणून घोषित करावे, अशी सूचना केली आहे. आयएएएफ परिषदेची शुक्रवारी बैठक होणार असून, त्यात आॅलिम्पिकच्या या अव्वल क्रीडा प्रकारावर घोंघावत असलेल्या संकटावर चर्चा होणार आहे. पुढील महिन्यात मोनाकोमध्ये होणाऱ्या आयएएएफच्या बैठकीमध्ये रशियावर अस्थायी स्वरूपाच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. रशियन क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे, की वाडाच्या आयोगाच्या अहवालाचे आश्चर्य वाटले नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एआरएफ) अडचणींची माहिती असून आम्ही परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. आता एआरएफमध्ये नवे अध्यक्ष, नवे मुख्य प्रशिक्षक असून, कोचिंग स्टाफला नवे स्वरूप देण्यात येत आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढे म्हटले आहे, की रशिया खेळातील डोपिंगविरोधी लढाईमध्ये सहभागी आहे. एआरएएफचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणाले, की महासंघ आयएएएफला उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी वाढवण्याची मागणी करणार आहे.वाडाच्या आयोगाने रशियाच्या पाच खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केली आहे. त्यात ८०० मीटर शर्यतीची आॅलिम्पक चॅम्पियन मारिया सेव्हिनोव्हाचाही समावेश आहे. डोपिंग करणाऱ्या खेळाडूंच्या समावेशामुळे लंडन २०१३ च्या आॅलिम्पिक स्पर्धेला नुकसान सोसावे लागले होते, असेही आयोगाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)