शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळ भारतीय हॉकीसाठी शानदार ठरेल

By admin | Updated: February 1, 2017 04:52 IST

गतवर्ष भारतीय हॉकीसाठी शानदार ठरले. सिनिअर पुरुष संघाने रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपुर्व फेरीपर्यंत धडक मारली. ज्यूनिअर संघाने विश्वचषकावर कब्जा केला,

- रोहित नाईक,  मुंबईगतवर्ष भारतीय हॉकीसाठी शानदार ठरले. सिनिअर पुरुष संघाने रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपुर्व फेरीपर्यंत धडक मारली. ज्यूनिअर संघाने विश्वचषकावर कब्जा केला, तर महिला संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. त्यामुळे येणारा काळ भारतीय हॉकीसाठी नक्कीच शानदार ठरेल, असा विश्वास भारताच्या ज्यूनिअर संघाचा कर्णधार हरजित सिंग याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरजितच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या ज्यूनिअर संघाने गेल्यावर्षी विश्वचषक पटकावला. सध्या हॉकी लीग स्पर्धेत दिल्ली वेव रायडर्स संघाकडून हरजित खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अनुभवाबाबत हरजित म्हणाला की, ‘ज्यूनिअर विश्वचषक स्पर्धेचा अनुभव खूप चांगला होता. प्रशिक्षक हरिंदर सिंग आणि सिनिअर संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्याकडून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. भविष्यात याचा खूप फायदा मिळेल. कर्णधार म्हणून खेळाडूंमध्ये संघ भावना, शिस्त कशी आणायची हे शिकलो. सर्व खेळाडू स्पर्धात्मक खेळले असल्याने प्रत्येकाकडे अनुभव होता. त्यामुळे फार काही अडचणी आल्या नाहीत.’ त्याचप्रमाणे, ‘सध्या भारताच्या सिनिअर संघात स्थान मिळवणे माझे मुख्य लक्ष्य आहे. आगामी जागतिक स्पर्धेत आणि टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेत मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्यास मी प्रयत्नशील आहे. यात मी यशस्वी नक्की ठरेल,’ असा विश्वासही हरजितने व्यक्त केला. ज्यूनिअर विश्वचषक पटकावल्यानंतर आयुष्य बदलल्याचे सांगताना हरजित म्हणाला की, ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉकी भारतात पुन्हा आली, याचा आनंद आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली. शिवाय भारतीय संघाच्या कामगिरीमुळे युवा खेळाडू हॉकीकडे अधिक गांभिर्याने पाहू लागले. तसेच, हॉकी लीग स्पर्धेतून प्रत्येक युवा खेळाडू मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.’ लीग स्पर्धेचा फायदा घ्यावासध्या सुरु असलेल्या हॉकी लीगबाबत हरजीत म्हणाला, ‘या लीगचा भारतीय खेळाडूंनी फायदा घ्यावा. खूप कमी देशांमध्ये लीग होत असल्याने भारतीयांकडे संधी आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही लीग अत्यंत फायदेशीर आहे. तसेच आर्थिक बाजू सक्षम करण्यासही या लीगची खेळाडूंना मदत होत आहे. जवळपास सर्वच खेळाडू सर्वसामान्य घरातून आलेले असल्याने त्यांना आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.लीगमध्ये परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव जबरदस्त आहे. त्यांच्यासोबत खेळण्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. याचा सर्वाधिक फायदा युवा खेळाडूंना आहे. मोठमोठ्या सामन्यांतील दबावाला कसे सामोरे जावे यासारख्या टीप्स आणि खूप काही त्यांच्याकडून शिकण्यास मिळतात. - हरजितसिंग