शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही

By admin | Updated: July 10, 2015 01:57 IST

पुरुषांसारखी समान बक्षीस रक्कम महिलांना मिळेपर्यंत आपण राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप खेळणार नसल्याची घोषणा भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने केली आहे.

नवी दिल्ली : पुरुषांसारखी समान बक्षीस रक्कम महिलांना मिळेपर्यंत आपण राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप खेळणार नसल्याची घोषणा भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने केली आहे. केरळची ही खेळाडू प्रथमच आपल्या राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास उत्सुक होती; पण या स्पर्धेतील विजेत्या पुरुष खेळाडूंसाठी महिलांच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम अधिक असल्याने सलग चौथ्या वर्षी स्पर्धेतून माघार घेण्याचा दीपिकाने निर्णय घेतला. २३ वर्षांची दीपिका २०११मध्ये अखेरची राष्ट्रीय स्पर्धा खेळली, त्या वेळी ती चॅम्पियन बनली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान पटकविणारी एकमेव भारतीय दीपिका आपला मुद्दा पटवून सांगताना म्हणाली, ‘‘आम्ही समान बक्षीस रकमेचे हक्कदार आहोत. याच मुद्द्यांवर मी गेल्या तीन सत्रांत राष्ट्रीय स्पर्धेकडे पाठ फिरविली. पीएसए व्यावसायिक सर्किटमध्ये दोन्ही गटांत समान बक्षीस रक्कम दिली जाते.’’जागतिक क्रमवारीत दीपिका सध्या १८व्या स्थानावर आहे. ती म्हणते, ‘‘महिला आणि पुरुष खेळाडूंमध्ये पुरस्कार देताना भेदभाव का केला जातो, हे समजण्यापलीकडचे आहे. मी केरळमध्ये खेळण्यास इच्छुक होते; पण याच कारणामुळे मी खेळू शकणार नाही, याचे शल्य आहे.’’ केरळ स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव अनिश मॅथ्यू म्हणाले, ‘‘स्पर्धेत एकूण ६.७ लाख रुपयांचे पुरस्कार दिले जातील. दोन्ही गटांतील विजेत्याना किती रक्कम दिली जाईल, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.’’ (वृत्तसंस्था)