बाइक राइड : मुंबई ते सिंगापूर व्हाया रोड... ५ बाइकर्सचा सहभागमहेश चेमटे, मुंबई -‘मंजिल कितनी भी दुर हो, रास्ते तो पैरों के निचे से ही जाते है...’ या ओळी प्रमाणेच ५ तरुण एकत्र आले, त्यांनी पाहीले , त्यांनी ठरवले आणि ते निघाले. तारुण्यात अंगात सळसळते रक्त असते , आकाश कवेत घेण्याची उमेद असते. याच उमेदीच्या जोरावर मुंबई, पुणे आणि इंदौरमधीस ५ तरुणांनी २० दिवसांत १ ८ हजार किमी प्रवास करुन सिंगापुर गाठले ते ही बाईकने. सोबत होती बाईक रायडिंगची पॅशन आणि पायांसोबत मनाला लागलेली प्रवासाची भिंगरी... ‘हारर्ली ओनरर्स अॉफ इंडिया’ या ग्रुपच्या राहुल देशमुख, देबोशिष घोष, धर्मेद्र जैन, युहान मुबारकी आणि दिनेश रोरा या पाच बाईकस्वारांनी आपल्या ह्य हारर्ली डेव्हिडसन ह्य बाईकवर सिंगापुरला जाण्याचा निर्णय घेतला. ते जाऊनही आले. आपआपल्या कामकाजात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी रायडिंगच्या क्षेत्राला एक नवी उंची देण्यासाठी हे साहस केले. तब्बल मुंबई ते सिंगापुर असा प्रवास करताना त्यांनी १८००० किमीचे अंतर कापले.त्यांनी हे मिशन सिंगापुर २० दिवसात पुर्ण केले. विविध कागद पत्रांची जमावाजमव, बाईकची काळजी तब्बल सहा महिन्यांच्या तयारी नंतर त्यांनी हे मिशन सिंगापुर पुर्ण केले. वांद्र्यातुन निघाल्यानंतर आशियाई महामार्ग १ वरुन जाताना इंदौर, झांसी, लखनऊ यामार्गातील रोड अफलातुन होते. पण बिहारमध्ये जाताच तेथील रस्त्यांच्या दुरावस्थेने हाल झाले. शहारांच्या हद्दी पार करताना अडचण आली नाही. लष्कराच्या योग्य मदतीने हा प्रवास सुखरुप झाला. त्यानंतर म्यानमारच्या आधी १५० किमी चा रस्ता तर खुपच वाईट होता. कच्च्या रस्त्यापेक्षाही वाईट असा तो रोड होता. पण महामार्ग म्हणजे काय? याचे उत्तर म्यानमार ते क्वालांलापुर या मध्ये मिळते. मलेशिया नंतर पुढील प्रवास खुपच सोईस्कर पार पडला. किंबहुना त्या रोड मुळे कुठेही रायडिंगमध्ये थकवा जाणवला नाही, असे या मिशनचा रायडर राहुल देशमुखने सांगितले.प्रत्येक दिवसाला साधारण पणे ६०० ते ७०० किमी गाडी चालवण्याचे ठरवले. या रायडिंगमध्ये कोणतीही रिस्क न घेता हे मिशन सहज पुर्ण केले. या मिशनमध्ये गुगल मॅप चा सिंहाचा वाटा होता. त्याच प्रमाणे वेगवेगळ््या देशांतील नागरिक विशेषत: ईशान्य भारतातील लोकांनी केलेले सहकार्य खरच अफलातुन होते. अतिथी देवो भव...अतिथी देवो भवचा अर्थ तेथील लोकांच्या आदरातिथ्या वरुन कळते. या संपुर्ण प्रवासात एक ठिकाण वगळता रात्रीचे रायडिंग करणे टाळले. मलेशिया अगोदर क्वालालापुरमधील हॉटेल मध्ये अॅडव्हान्स बुकींग केल्याने तेथे पोहचण्यासाठी घाई झाली. त्यानंतर संपुर्ण प्रवास शिस्तीने व काळजीपुर्वक पुर्ण केला. हारर्ली ओनरर्स अॉफ इंडिया च्यावतीने याआधी या रायडरर्सनी भारतातील सर्व प्रमुख शहरांसह खेडोपाडी फिरुन रस्तेच नव्हे तर खड्डे देखील पार केले आहेत.
१८ हजार किमीचा अविस्मरणीय प्रवास
By admin | Updated: June 7, 2015 00:43 IST