शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अंडर१९ वर्ल्डकप - भारताचा श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय, भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: February 9, 2016 17:45 IST

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते

ऑनलाइन लोकमत 
मिरपूर, दि. ९ - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्मात असलेला ऋषभ पंतला अवघ्या १४ धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार ईशान किसनही लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद २७ अशी बिकट झाली होती. पण सर्फराज खान आणि अनमोलप्रीत सिंग यांच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला.
 
भारताकडून अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक (७२), सर्फराज खान (५९) आणि वॉशिंगटन सुंदरने (४३) धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. पन्नास षटकांच्या अखेरीस भारताला ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६७ धावा करता आल्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेकडून पी.मेंडिस(३९), शामू अशान(३८) यांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा खेळपट्टीवर निभाव लागला नाही. भारताकडून मयांक डागर याने भेदक गोलंदाजी करत ५.४ षटकांत २१ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या, तर आवेश खान याने ९ षटकांत ४१ धावा देऊन २ विकेट्स मिळवल्या. के.अहमद, राहुल बाथम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, दुसऱया उपांत्य फेरीत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात विजयी ठरणाऱया संघाची अंतिम फेरीत भारताशी लढत होईल.

भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. भारताने साखळी फेरीत आयर्लंड, न्यूझीलंड आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर नामिबियाचा १९७ धावांच्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे २६६ व ३०४ धावा फटकावल्या आहेत. भारतीय संघाचे हे दोन प्रमुख फलंदाज आहेत.