शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

‘यू मुंबा’ ने काढला वचपा....

By admin | Updated: July 19, 2015 01:12 IST

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान यू मुंबा संघाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात विजयी सलामी देताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथरचा अवघ्या एका गुणाने

- महेश चेमटे,  मुंबईअखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान यू मुंबा संघाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात विजयी सलामी देताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथरचा अवघ्या एका गुणाने २९-२८ असा पराभव केला. उपकर्णधार जीवा कुमार आणि अव्वल खेळाडू विशाल माने यांचा खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.कर्णधार अनुप कुमारने पहिली चढाई करताना गतविजेत्यांचा अंदाज घेतला. रिशांक देवाडिगाने आक्रमक चढाई करताना मुंबईच्या गुणांचे खाते उघडले. पहिल्या ५ मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करून सामन्याची रंगत वाढवली. यानंतर मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. स्टार रायडर शब्बीर बापूने चकमदार चढाई करून मुंबईला ७-३ असे आघाडीवर नेले. यानंतर लगेच जयपूरच्या सोनीची पकड करून मुंबईकरांनी मजबूत पकड मिळवली. मध्यंतराला मुंबईने १६-१५ अशी नाममात्र आघाडी घेऊन सामन्यावर वर्चस्व मिळवले. यानंतर जयपूरने अनपेक्षित मुसंडी मारली. नवनीत गौतम, जसवीर यांनी आक्रमक चढाया, तर राजेश नरवालने दमदार पकडी करून मुंबईवर ३४व्या मिनिटाला लोण चढवून जयपूरला २४-२३ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनिटाला अनुपने निर्णायक गुण मिळवत मुंबईला २९-२८असा निसटता विजय मिळवून दिला.

‘बुल्स’ची विजयी मुसंडीदुसऱ्या सामन्यात बंगळुरु बुल्स संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना बंगाल वॉरियर्सचे कडवे आव्हान ३३-२५ असे सहजपणे परतावून प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राची विजयी सुरुवात केली.