शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांचे तिकीट सात हजारांना

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

‘टी-२०’ विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन मातब्बर संघांमधील सामन्याला नागपूरसोबतच आजूबाजूच्या राज्यांतूनदेखील क्रिकेटरसिक आले होते.

- योगेश पांडे,  नागपूर‘टी-२०’ विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन मातब्बर संघांमधील सामन्याला नागपूरसोबतच आजूबाजूच्या राज्यांतूनदेखील क्रिकेटरसिक आले होते. क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री ‘आॅनलाइन’ असल्यामुळे काळ््याबाजाराला प्रचंड ऊत आला होता. ‘लकी ड्रॉ’मध्ये क्रमांक लागलेल्या अनेक तथाकथित पांढरपेशांनीदेखील यात आपले हात धुऊन घेतले. सामना सुरू होण्याच्या काही वेळ अगोदरपर्यंत ५०० चे तिकीट अडीच हजारांना तर दोन हजारांचे तिकीट सात हजारांहून अधिक किमतीला विकण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ला आढळून आले.नागपुरातील या ‘हायप्रोफाईल’ सामन्यासाठी किमान ४०० आणि जास्तीत जास्त ३३ हजार अशा किमतीची तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सर्व विक्री ‘आॅनलाइन’ होती व यासाठी इच्छुकांना २४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंतच नोंदणी करायची होती. त्यानंतर ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून तिकीट विक्री करण्यात आली. नियमांनुसार भारताचा सामना असल्याने प्रत्येक नोंदणीसाठी दोनच तिकीट देण्यात आली. यातील ४००, ५००, १०००, १५०० आणि दोन हजार रुपयांच्या तिकिटांना सर्वात जास्त मागणी होती. एका खासगी संकेतस्थळाकडूनदेखील तिकीट विक्री करण्यात आली व ही कमी दराची तिकिटे हातोहात ‘बुक’ झाली. जास्त दरांच्या तिकिटांनादेखील मागणी असल्याचे दिसून आले. परिणामी मंगळवारी १२ हजार रुपयांची तिकिटेदेखील शिल्लक नव्हती. परिणामी क्रिकेटसाठी ‘कुछ भी करेगा’ अशी मानसिकता असणाऱ्यांनी वाट्टेल त्या किमतीत तिकिटे घेण्याची तयारी दाखविली. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किमतीला तिकिटे विकली जात होती. तरुणांचा सहभागअनेक जणांना ‘लकी ड्रॉ’मध्ये तिकिटे लागली होती. यातील काहींनी प्रत्यक्ष सामन्याला न जाता तिकिटे चढ्या भावाने विकली. विशेषत: बाहेरून आलेल्या क्रिकेट चाहत्यांनी मागेल त्या किमतीत तिकिटे घेतल्याचे आढळून आले. यात विद्यार्थी, पांढरपेशे तरुण यांचा सहभाग जास्त दिसून आला. एकेका तिकिटामागे हजार रुपयांचा नफा कमाविला, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून प्रसार‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून सर्वात जास्त तिकिटांचा काळाबाजार झाला. आपल्याकडे तिकीट असून इच्छुकांनी संपर्क करावा. अनेकांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या विविध ‘ग्रुप’वर संदेश टाकले. त्यामुळे एकमेकांना न ओळखणाऱ्यांमध्येदेखील काळ््याबाजारामार्फत तिकीट विक्री करणे शक्य झाले. आश्चर्याची बाब म्हणजे यावर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून आला नाही.