शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विजयाची कास धरण्यास उभय संघ उत्सुक

By admin | Updated: April 18, 2016 02:49 IST

खेळाडूंच्या दुखापती व कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आणि संमिश्र कामगिरी करणारा विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ

मुंबई-हैदराबाद आज लढत : सनरायझर्सला दुखापतग्रस्त खेळाडूंची चिंताहैदराबाद : खेळाडूंच्या दुखापती व कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आणि संमिश्र कामगिरी करणारा विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ यांच्यादरम्यान उद्या (सोमवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात लढत होणार आहे. या लढतीच्या निमित्ताने उभय संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहेत. आघाडीचे खेळाडू युवराजसिंग, केन विल्यमसन व आशिष नेहरा दुखापतग्रस्त असल्यामुळे हैदराबाद संघ कमकुवत झाला आहे. हैदराबाद संघाला पहिल्या दोन्ही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद संघाचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ४५ धावांनी तर कोलकाता नाइट रायडर्सने ८ गडी राखून पराभव केला आहे. सनरायझर्स संघाची भिस्त बऱ्याचअंशी कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी धवन, मोझेस हेन्रिक्स, मॉर्गन, दीपक हुडा व ओझा यांनाही मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये संघाला फॉर्मात असलेल्या नेहराची उणीव भासत आहे. सनरायझर्सला भुवनेश्वरकुमार, मुस्तफिझूर रहमान, कर्ण शर्मा, अभिमन्यू मिथुन व बरिंदर सरन या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. मुंबई इंडियन्सचा विचार करता त्यांना आतापर्यंत तीनपैकी केवळ एका लढतीत विजय मिळवता आला. मुंबई इंडियन्स संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. मुंबई इंडियन्सला सलामी लढतीत आयपीएलचा नवा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. पण शनिवारी त्यांना गुजरात लायन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. केकेआरविरुद्ध नाबाद ८४ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे. याव्यतिरिक्त बिग हिटर किरॉन पोलार्ड व इंग्लंडचा जोस बटलर यांनाही चमकदार कामगिरी करावी लागेल. अंबाती रायुडू, हार्दिक पंड्या व पार्थिव पटेल यांच्याकडूनही उपयुक्त योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये मुंबई इंडियन्सची भिस्त मिशेल मॅक्लेनघन, हरभजनसिंग, टीम साउदी व जसप्रीत बुमराह यांच्यावर अवलंबून आहे. सनरायझर्स संघासाठी सलग दोन पराभवानंतर विजय मिळवणे गरजेचे आहे. संघाचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी संघ दमदार पुनरागमन करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. उभय संघ यातून निवडणारमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन