शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांचा युवराज भारताचा उगवता तारा

By admin | Updated: March 18, 2017 06:02 IST

रेसिंग या क्रीडा प्रकाराचा भारतात मर्यादित चाहता वर्ग आहे. त्यातही, मातीच्या आणि ओबडधोबड ट्रॅकवर होणाऱ्या डर्ट बाईक रेसचा चाहता वर्ग भारतात खूप कमी आहे.

- रोहित नाईक,  मुंबई

मुंबई : रेसिंग या क्रीडा प्रकाराचा भारतात मर्यादित चाहता वर्ग आहे. त्यातही, मातीच्या आणि ओबडधोबड ट्रॅकवर होणाऱ्या डर्ट बाईक रेसचा चाहता वर्ग भारतात खूप कमी आहे. मात्र, याच डर्ट बाईकच्या जागतिक नकाशावर सध्या एक भारतीय तारा चमकत असून, मलेशिया येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद रेसचा तो संभाव्य विजेता मानला जात आहे. विशेष म्हणजे हा सुपरस्टार रायडर अवघा १२ वर्षांचा मऱ्हाठमोळा पुणेकर असून, त्याचे नाव युवराज कोंडे-देशमुख आहे. डर्ट बाईकचा आठवेळचा राष्ट्रीय विजेता रुस्तम पटेलच्या मार्गदर्शनाखाली युवराज प्रशिक्षण घेत आहे. शुक्रवारी तो मलेशियाला रवाना झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून बाईक चालविण्यास सुरुवात केलेल्या युवराजने भारतात डर्ट बाईकमध्ये एकहाती दबदबा निर्माण केला. देशातील जवळपास सर्वच राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या युवराजने दुबई रेसिंगमध्ये बाजी मारत ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला. तसेच, जागतिक डर्ट बाईक रेसची राजधानी असलेल्या अमेरिकेत युवराजने पुणेरी हिसका दाखविताना थेट उपविजेतेपदाला गवसणी घातली. तरी, आगामी २४ व २५ मार्चला होणारी आशियाई शर्यत युवराजसाठी वेगळी असेल. त्याने याआधी कधीच आशियाई रायडर्सचा सामना केलेला नसल्याने ‘ही शर्यत मोठे आव्हान ठरेल. प्रत्येक प्रतिस्पर्धी माझ्यासाठी नवखा असल्याने त्यांच्याबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, तरीही जेतेपद जिंकण्यात मी यशस्वी ठरेल,’ असे युवराजने ‘लोकमत’ला दिली. २००९ साली एका राष्ट्रीय स्पर्धेत मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी मी पहिल्यांदा युवराजला पाहिले. ती त्याची पहिलीच शर्यत होती. तो ज्या प्रकारे जम्प्स मारत होता ते पाहून मी थक्क झालो. एखाद्या कसलेल्या रायडरप्रमाणे तो ट्रॅकवर वावरत होता. त्याच्यापुढे इतर प्रतिस्पर्धी खूपच कमजोर भासले. तेव्हाच मी त्याला प्रशिक्षित करण्याचे ठरविले. आज तो डर्ट बाईक रेसमधील उगवता तारा असून, त्याची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद असेल. - रुस्तम पटेल, युवराजचे प्रशिक्षक