शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्या विकेट्स ठरल्या सामन्यातील टर्निंग पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:21 IST

विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघ सहजपणे जिंकणरा असे वाटत असतानाचा पडलेल्या दोन विकेट्स सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्या.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 -  ऐतिहासिक लॉर्डसवर झालेल्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला विश्वविजयाने हुलकावणी दिली. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. भारतीय महिला संघ सहजपणे जिंकणरा असे वाटत असतानाचा पडलेल्या दोन विकेट्स सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्या. जर त्या विकेट्स पडल्या नसत्या तर कदाचित भारतीय संघाच्या हातात विश्वचषक दिसला असता.
 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर भारतीय संघासमोर केवळ 229 धावांचे माफक आव्हान होते. पण या आव्हानाचा पाठलाग करणाताना स्मृती मंधाना आणि मिताली राज बाद झाल्या. पण या परिस्थितीत पूनम राऊतने झुंजार खेळी करत भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करून दिले होते. वेदा कृष्णमूर्तीही तिला चांगली साथ देताना सुरेख फटकेबाजी करत होती. पूनम राऊत ऐतिहासिक लॉर्ड्सवर भारताला अविस्मरणीय विजय मिळवून देणार असे वाटत होते.  पण भारतीय संघ 3 बाद 191 अशा सुस्थितीत असताना पूनम राऊत 86 धावांवर बाद झाली. पूनम बाद झाल्यावर भारतीय संघाची मदार वेदा कृष्णमूर्तीवर होती. पण वेदा 34 चेंडूत 35 धावा फटकावून माघारी परतली. या दोघींच्या विकेट्स श्रुबसोलने टिपल्या. या दोन्ही धाकड खेळाडू माघारी परतल्यावर भारताची तळाची फलंदाजी उघडी पडली आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी डाव साधला.  
भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांचे महिला विश्वचषकातील हे चौथे विजेतेपद ठरले.