शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गोलंदाजांमुळे भारत अडचणीत

By admin | Updated: January 10, 2015 01:17 IST

गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघ चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर अडचणीत सापडला आहे.

चौथी कसोटी : आश्विनचे अर्धशतक, भारत सर्व बाद ४७५; आॅस्ट्रेलिया दुसरा डाव ६ बाद २५१सिडनी : गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघ चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर अडचणीत सापडला आहे. चहापानाच्या विश्रांतीनंतर भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियन संघाला २१३ धावा बहाल केल्या. पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेणाऱ्या आॅस्ट्रेलियाने आज चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४० षटकांत ६ बाद २५१ धावांची मजल मारली. आॅस्ट्रेलियाकडे एकूण ३४८ धावांची आघाडी असून यजमान संघ शनिवारी याच धावसंख्येवर डाव घोषित करण्याची शक्यता आहे. खेळपट्टीवर चेंडू वळत असून, अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांपुढे पराभव टाळण्याचे आव्हान असेल.भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ३ षटकांत ४५ धावा बहाल केल्या. आर. आश्विनने १०५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. विदेशातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याआधी, कालच्या ५ बाद ३४२ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव ४७२ धावांत संपुष्टात आला. विराट कोहली (१४७) आज झटपट माघारी परतल्यानंतर आश्विन (५०), रिद्धिमान साहा (३५) व भुवनेश्वर कुमार यांनी संयमी फलंदाजी करून फॉलोआॅनचे सावट टाळले. आश्विनला आज खेळपट्टीकडून मिळणारी मदत बघता, शनिवारी आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनविरुद्ध भारतीय फलंदाजांपुढे सामना वाचविण्याचे आव्हान असेल. भारतीय फलंदाजांना पाचवा दिवस खेळून काढण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. सिडनीमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम यजमान आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे. आॅस्ट्रेलियाने २००६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ बाद २८८ धावा फटकावून विजय मिळविला होता. पाहुण्या संघाच्या कामगिरीचा विचार करता, इंग्लंडने १९०३मध्ये १९४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. यजमान संघ मालिकेत ३-०ने विजय मिळविण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. आश्विनने ४ बळी घेतले असले, तरी त्याचा आॅस्ट्रेलियन फलंदाजीवर विशेष परिणाम झाला नाही. कर्णधार स्टीव्हन स्मिथने (७१) अर्धशतकी खेळी केली. डेव्हिड वॉर्नर झटपट माघारी परतल्यानंतर ख्रिस रॉजर्सने (५६) त्याला चांगली साथ दिली. जो बर्न्स (६६) आणि ब्रॅड हॅडीन (नाबाद ३१) यांनी आक्रमक फलंदाजी करून आॅस्ट्रेलियाला दमदार मजल मारून दिली. शेन वॉटसनला (१६) मोठी खेळी करता आली नाही. त्याआधी, सकाळच्या सत्रात आश्विन व भुवनेश्वर यांनी आठव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मोहंमद शमीने नाबाद १६ धावांचे, उमेश यादवने ४ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव : ७ बाद ५७२ (डाव घोषित).भारत पहिला डाव : मुरली विजय झे. हॅडीन गो. स्टार्क ०, लोकेश राहुल झे. व गो. स्टार्क ११०, रोहित शर्मा त्रि. गो. लियोन ५३, विराट कोहली झे. रोजर्स गो. हॅरिस १४७, अजिंक्य राहणे पायचित गो. वॉटसन १३, सुरेश रैना झे. हॅडीन गो. वॉटसन ०, रिद्धिमान साहा झे. स्मिथ गो. जोश ३५, रविचंद्रन आश्विन झे. हॅडीन गो. स्टार्क ५०, भुवनेश्वर कुमार झे. वॉटसन गो. लियोन ३०, मोहंमद शमी नाबाद १६, उमेश यादव झे. हॅडीन गो. हॅरिस ४. अवांतर : १७. एकूण : १६२ षटकांत सर्व बाद ४७५. बाद क्रम : १-०, २-९७, ३-२३८, ४-२९२, ५-२९२, ६-३५२, ७-३८३, ८-४४८, ९-४५६.गोलंदाजी : स्टार्क ३२-७-१०६-३, हॅरिस ३१-७-९६-२, जोश २९-८-६४-१, लियोन ४६-११-१२३-२, वॉटसन २०-४-५८-२, स्मिथ ४-०-१७-०.आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : ख्रिस रॉजर्स झे. रैना गो. भुवनेश्वर ५६, डेव्हिड वॉर्नर झे. विजय गो. आश्विन ४, शेन वॉटसन त्रि. गो. आश्विन १६, स्टीव्हन स्मिथ पायचित गो. शमी ७१, शॉन मार्श झे. विजय गो. आश्विन १, जो बर्न्स झे. यादव गो. आश्विन ६६, ब्रॅड हॅडीन खेळत आहे ३१, रॅन हॅरिस खेळत आहे ०. अवांतर : ६. एकूण : ४० षटकांत ६ बाद २५१. बाद क्रम : १-६, २-४६, ३-१२६. ४-१३९, ५-१६५, ६-२५१. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-०-४६-१, आश्विन १९-२-१०५-४, शमी ६-०-३३-१, उमेश ३-०-४५-०, रैना ४-०-१८-०.स्मिथने मोडला ब्रॅडमनचा विक्रमआॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने भारताविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ७६९ धावा फटकावून महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला; पण एव्हर्टन विक्सचा विक्रम मोडण्यात तो अपयशी ठरला. स्मिथने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात आज आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ७१ धावांची खेळी केली. त्याने मालिकेत एकूण ७६९ धावा फटकावल्या. त्याने मालिकेतील ८ डावांमध्ये ४ शतके, तर २ अर्धशतके फटकावली. यापूर्वीचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी १९४७-४८च्या मालिकेत भारताविरुद्ध पाच सामन्यांतील ६ डावांमध्ये एकूण ७१५ धावा फटकावल्या होत्या. मालिकेत ४ सामने खेळताना सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. विंडीजच्या व्हिव रिचर्ड्सने १९७६मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२९, तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करने १९७१मध्ये विंंडीजविरुद्ध ७७४ धावा केल्या होत्या. फिरकीपटूंची भूमिका निर्णायकपाचव्या दिवशी फिरकीपटूंची भूमिका निर्णायक राहील. विकेट टर्न होत असल्याने अखेरच्या दिवशी फलंदाजी करणे कठीण जाईल. आम्ही १० गडी बाद करण्यात यशस्वी होऊ, याची खात्री आहे. आम्ही लक्ष्य ठेवले नव्हते. अधिकाधिक धावा काढण्याचे ठरविले होते. आमचे साधे डावपेच होते आणि चौथ्या दिवशी ते अलगद लागू पडल्याने आम्ही सुस्थितीत आहोत.- ज्यो बर्न्स, फलंदाजआश्विनचे १०० बळी व एक हजार धावाच्रविचंद्रन आश्विनने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करताना कसोटी कारकिर्दीतील १ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याचप्रमाणे १०० बळी व १००० हजार धावा फटकावणारा तो नववा भारतीय क्रिकेटपटू ठरला. च्आश्विनने आज ४४वी धाव घेतली, त्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वीच १०० बळी घेतले आहेत. त्यानंतर त्याने आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात १०५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. विदेशातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कारकिर्दीतील २४वा सामना खेळणाऱ्या आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १००६ धावा केल्या आहेत.च्भारतातर्फे आश्विनपूर्वी विनू मंकड, कपिल देव, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजनसिंग, झहीर खान आणि इरफान पठाण यांनी १ हजारापेक्षा अधिक धावा व १०० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. च्आश्विनने केवळ २४व्या कसोटीत हे दुहेरी यश संपादन केले. इयान बोथम (२१ सामने) आणि विनू मंकड (२३) यांनी आश्विनपेक्षा कमी सामन्यांत अशी कामगिरी केली आहे. च्आश्विनने जो बर्न्सला बाद करून आॅस्ट्रेलियाविरुद्ध ५० बळींचा टप्पा गाठला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध आश्विनचा हा १०वा सामना आहे. चौथ्या दिवशी आमच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला धावांची भेट दिली. आम्ही नव्या चेंडूने खराब सुरुवात केली. इतक्या धावा द्यायला नको होत्या. असे घडले नसते, तर स्थिती वेगळी असती. मी दीर्घ काळ खेळू इच्छित होतो; पण सामन्यात बरोबरीची संधी आहे. सामन्याचा निकाल डावपेचांवर आधारित असेल.- रविचंद्रन आश्विन