शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

रेल्वेला २१७ धावांत रोखले

By admin | Updated: November 16, 2015 02:31 IST

हुकमी गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ या जोरावर यजमान मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यात रेल्वेचा पहिला डाव २१७ धावांत गुंडाळला

मुंबई : हुकमी गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ या जोरावर यजमान मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यात रेल्वेचा पहिला डाव २१७ धावांत गुंडाळला. यानंतर मुंबईकरांची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर जय बिस्त व नाईट वॉचमन म्हणून आलेला धवल कुलकर्णी स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची पहिल्या दिवसअखेर २ बाद ४ धावा अशी अवस्था झाली.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. गतमहिन्यात झालेल्या भारत - दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यानंतर वानखेडेची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर झालेल्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यातही दोन्ही संघांच्या फलंदाजांनी सुमारे १२००च्या आसपास धावा केल्या होत्या. त्यामुळेच या सामन्यातही फलंदाज वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र गोलंदाजांनी सगळी सूत्रे आपल्याकडे ठेवली.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रेल्वेची सुरुवात अडखळती झाली. शार्दुल आणि धवल कुलकर्णी यांनी टिच्चून मारा करून रेल्वेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. यानंतर शार्दुलने आपला हिसका दाखवला. त्याने सलामीवीर सौरभ वाकसकर आणि व्ही. चेलुवराज यांना बाद केले. पुढच्याच षटकात कुलकर्णीने आशिष सिंगला बाद करून रेल्वेला तिसरा धक्का दिला. व्ही. सिंग आणि अरिंदम घोष हे संघाला सावरणार असे दिसत असताना पुन्हा एकदा शार्दुलने रेल्वेला धक्का देत व्ही. सिंगला यष्टीरक्षक तरेकडे झेल देण्यास भाग पाडले आणि प्रतिस्पर्ध्यांना ४ बाद ४८ असे अडचणीत पकडले.या वेळी मुंबईकर रेल्वेला जोरदार ‘ब्रेक’ लावणार असे चित्र दिसत असतानाच घोष व एस. एस. मिश्रा यांनी पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पुन्हा एकदा शार्दुलने मुंबईला यश मिळवून देताना मिश्राला बाद केले. मिश्राने १२८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४६ धावा काढल्या. एका बाजूने घोष खंबीरपणे रेल्वेची धावसंख्या पुढे नेत होता. मात्र इतर फलंदाजांची योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव ८ बाद १८३ असा घसरला. यानंतर झुंजार अर्धशतकी खेळी करणारा घोषही परतला. त्याने १८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६७ धावांची संयमी खेळी केली. धवल कुलकर्णीने अखेरचा फलंदाज अनुरीत सिंगची यष्टी उखडून रेल्वेचा डाव २१७ धावांत संपुष्टात आणला. शार्दुलने सर्वांत यशस्वी मारा करताना १९ षटकांत ३८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. तर कुलकर्णी आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. विशाल दाभोळकर आणि जय बिस्त यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक रेल्वे (पहिला डाव) : सौरभ वाकसकर झे. तरे गो. ठाकूर ४, आशिष सिंग झे. तरे गो. कुलकर्णी ३, व्ही. चेलुवराज झे. यादव गो. ठाकूर ७, व्ही. सिंग झे. तरे गो. ठाकूर २८, अरिंदम घोष झे. यादव गो. दाभोळकर ६७, एस.एस. मिश्रा झे. तरे गो. ठाकूर ४६, महेश रावत झे. हेरवाडकर गो. हरमीत १६, कर्ण शर्मा झे. ठाकूर गो. बिस्त ४, अक्षत पांड्ये झे. हेरवाडकर गो. हरमीत १२, अर्णब नंदी नाबाद ७, अनुरीत सिंग त्रि. गो. कुलकर्णी १९. अवांतर - ४. एकूण : ८४.४ षटकांत सर्वबाद २१७ धावा.गोलंदाज : धवल कुलकर्णी १६.४-५-४०-२; शार्दुल ठाकूर १९-७-३८-४; विशाल दाभोळकर २६-५-७८-१; हरमीत सिंग १६-२-४१-२; जय बिस्त ७-१-१८-१.मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर खेळत आहे २, जय बिस्त झे. मिश्रा गो. अनुरीत सिंग २, धवल कुलकर्णी त्रि. गो. शर्मा ०. अवांतर - ०. एकूण : ३.५ षटकांत २ बाद ४ धावा.गोलंदाजी : अनुरीत सिंग २-१-३-१; कर्ण शर्मा १.५-१-१-१.