शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

ताम्हिणी घाटातील ट्रेकमुळे विराटसेनेची गाडी ट्रॅकवर

By admin | Updated: March 7, 2017 18:05 IST

भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाच झाला, असे म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला

 नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमतबेंगळुरु, दि. 7 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाने विरोधी संघावर हुकूमत गाजवताना निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ रोखण्यासाठी खेळपट्टी आणि खेळाडूंचा महिनाभर अभ्यास करून तगडे आव्हान दिले आहे. 19 कसोटी सामन्यानंतर पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात 333 धावांच्या माणहानीकारक पराभवाला भारताला सामोर जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतील कात्रजचा घाट दाखवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी विराट सेनेला घेऊन थेट ताम्हिणी घाट गाठला होता. विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर जम्बो उर्फ कुंबळेचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात सर्व संघासह मनसोक्त ट्रेकिंग केले. गेल्या 18 महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाट झाला म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. बंगळुरू कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाने सर्व प्रकारे तयारी केली होती. संयम कधी बाळगावा आणि आक्रमकपणा कधी आणावा तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारताने ताम्हिणी घाटात ट्रेकही केला होता.पुण्यातील विजयानंतर बंगळुरू कसोटीमध्ये पाहुण्या संघ मनोधैर्यासह मैदानात उतरला होता. पहिल्या डावात त्यांनी आघाडी घेत दुसरी कसोटी खिशात घालणार,असे वाटत होते. पण सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजयश्री खेचून आणला. ताम्हिणी घाटातील ट्रेकिंग नंतर कोहली अँड कंपनीने पुण्यातील कामगिरीबाबत अधिक विचार न करता बेंगळुरू कसोटीत चमकदार कामगिरी करत कसोटीतील आपली बादशाहत कायम ठेवली आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 बरोबरी करत बॉर्डर-गावस्कर चषकात रोमांचकता वाढवली आहे. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच वाढले असेल. यानंतर भारतीय संघाने खेळावर आणि आपल्या कामगिरीवर अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ते करण्यासाठी मनात कुठेही किंतु परंतु नको. निराशा व राग यामुळे भारतीय संघाची कामगिरी भरकटू शकते. ताम्हिणी घाटातील ट्रेकनंतर भारतीय संघाचे मनोबल, आत्मविश्वास उंचावलेला आहे, पुढच्या दोन कसोटी सामन्यात भारताने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखायला हवे. पाहुण्या संघाविरुद्ध आगामी दोन्ही कसोटी सामन्यत भारताने निर्विवाद वर्चस्व राखल्यास ताम्हिणी घाटाच्या ट्रेकमुळे संघातील खेळाडू ट्रॅकवर आले, असेच म्हणावे लागेल. दोन कसोटीमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघानी केलेल्या तयारीकडे डोळेझाक करू शकत नाही. ऑस्ट्रेलियन संघाने दुबईमध्ये सराव केला. त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. पुणे आणि बंगळुरू कसोटी सामन्यात त्याची प्रचिती आली. पाहुण्या संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे. रांची कसोटीमध्ये भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून विजयाचा निर्धार दाखवावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवर हल्लाबोल करावा लागणार आहे. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाची देहबोली निराशाजनक होती. ओकिफ आणि लायनविरुद्ध परंपरागत दृष्टिकोन राखून खेळण्याचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. त्यांच्याविरोधात आक्रमकपणे खेळण्यावर भर द्यावा लागेल. जोपर्यंत भारतीय संघ नंबर वन प्रमाणे क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत पाहुणा संघ भरतावर वर्चस्व गाजवू शकतो.