शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरावादरम्यान मानेतून आरपार गेला बाण, थोडक्यात बचावली १४ वर्षीय तिरंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:11 IST

भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला.

कोलकाता : भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला.साईचे विभागीय संचालक एम.एस. गोइंडी यांनी हा अपघात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘तिरंदाज फाजिला खातूनच्या मानेतून बाण आरपार गेला. तिच्यावर रुग्णायलात उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे.’गोइंडी पुढे म्हणाले,‘एक बाण तिच्या मानेतून आर-पार गेला, पण सुदैवाने तिच्या श्वसननलिकेला इजा झाली नाही. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.’ अहवालानुसार सहकारी तिरंदाज ज्वेल शेखच्या चुकीने सुटलेला बाण फाजिलाला लागला. व्हिडीओमध्ये फाजिला रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. गोइंडी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देताना म्हटले की,‘लक्ष्य साधताना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यावेळी तिरंदाज बाण गोळा करण्यासाठी जातात त्यावेळी नेम साधण्यास बंदी घालण्यात आली आहे. तिरंदाज आपल्या स्थानावर परत आल्यानंतरच नेम साधाण्याची सूचना देण्यात आली आहे, तरी हे कसे घडले, याची मला कल्पना नाही. भविष्यात असे घडणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’गोइंडी म्हणाले,‘सर्व प्रशिक्षक यासाठी जबाबदार आहेत. मी पूर्ण चौकशी करणार असून, आमच्याकडून कुठली चूक होणार नाही. भविष्यात अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. कदाचित प्रशिक्षण स्टाफकडून चूक झाली असावी. कारण एकदा एका सेटचा सराव झाल्यानंतर कुणी लक्ष्याचा वेध घेणार नाही, अशी घोषणा करण्यात येते.’ फाजिला रिकर्वची युवा तिरंदाज आहे. जुलैमध्ये जिल्हा स्पर्धेतील कामगिरीनुसार निवड झालेल्या २३ प्रशिक्षणार्थी तिरंदाजांमध्ये तिचा समावेश आहे. ती पुढील महिन्यात आयोजित आंतर साई स्पर्धेसाठी तयारी करीत होती.

टॅग्स :Sportsक्रीडा