शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

आज काट्याची टक्कर

By admin | Updated: May 20, 2015 01:35 IST

आयपीएल हंगामाचे अंतिम पर्व सुरू झाले असून, त्यात बुधवारी (दि.२०) राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंज बंगळुरू या तुल्यबळ संघात लढत होत आहे.

राजस्थान-बंगळुरू लढत : टीम विराट कोहली-स्टीव्ह स्मिथ समोरासमोर पुणे : आयपीएल हंगामाचे अंतिम पर्व सुरू झाले असून, त्यात बुधवारी (दि.२०) राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंज बंगळुरू या तुल्यबळ संघात लढत होत आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात ७ विजय मिळविले आहेत. कागदावर विराट कोहलीचा बंगळुरू संघ ताकदवान दिसत असला तरी स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान संघाच्या खेळाडूंची खेळी देखील रॉयलच आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बाजी मारून अंतिम सामन्याच्या दिशेने पहिले पाऊल कोणाचे पडते,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ८ वाजता या दोन संघांत लढत होणार आहे. स्टीव स्मिथच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानने साखळी सामन्यांतील अखेरचा सामना खिशात घालत अंतिम ४ संघांत स्थान पटकावले आहे. शेन वॉटसनच्या नाबाद १०४ धावांच्या घणाघाती शतकी खेळीने राजस्थानने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर संघाला धूळ चारत बाद फेरीत प्रवेश केला. राजस्थानचा अजिंक्य राहणे चांगलाच बहरात असून, त्याने १३ सामन्यांत ४९८ धावा केल्या आहेत. रहाणेच्या पुढे सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर असून, त्याच्या खात्यात १४ सामन्यांत ५६२ धावा आहेत. मात्र वॉर्नरचा संघ अंतिम ४ जणांच्या संघात स्थान मिळवू शकला नाही. आॅस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरने देखील राजस्थानसाठी उपयुक्त खेळाडूची भूमिका बजावली आहे. कोणत्याही स्थितीत उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज क्रिस मॉरिस देखील यशस्वी ठरला आहे. संजू सॅमसन, करुण नायर, धवल कुलकर्णी यांची कामगिरी चांगली होत आहे. राजस्थान व बंगळुरू संघाचे गुण समान असले तरी चांगल्या धावगतीमुळे बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सने मुंबईविरुद्ध १० मे रोजी झालेल्या सामन्यात नाबाद १३३ धावांची आक्रमक खेळी केली होती. ख्रिस गेल याने देखील शतकी खेळी केलेली आहे. या शिवाय कोहलीसारखा आक्रमक फलंदाजही त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीत मिशेल स्टार्क व यजुवेंद्र चहल यासारखे गोलंदाज आहेत. राहुल द्रविडकडे पालकत्व असलेल्या राजस्थानचा संघ २००८च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. तर २००९ व २०११ सालच्या स्पर्धेतील उपविजेत्या आरसीबीचा संघ देखील हुलकावणी देणाऱ्या पहिल्या विजेतेपदाच्या दृष्टीने कामगिरी करण्यास उत्सुक असेल. हा सामना गमविणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर विजयी संघ दुसरा क्वालिफायर खेळेल. हेड टू हेडरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध १६ वेळा खेळले आहेत. यामध्ये बंगळुरू आणि राजस्थानने प्रत्येकी ७ वेळा विजय नोंदविला आहे. दोन लढतींचा निकाल लागू शकला नाही.विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, मिशेल स्टार्क, निक मेडिनसन, वरुन आरॉन, यजुवेंद्र चहल, विजय झोल, अबू नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, मनविंदर बिस्ला, सीन एबॉट, जलज सक्सेना, सर्फराज खान, शिशिर बावणे, एस. अरविंद. अजिंक्य रहाणे (कर्णधार), शेन वॉटसन, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, संजू सॅमसन, करुण नायर, धवल कुलकर्णी, टीम साऊदी, स्टुअर्ट बिन्नी, ख्रिस मॉरिस, प्रवीण तांबे, अभिषेक नायर, प्रदीप साहू, रस्टी थेरोन, दिनेश साळुंके, विक्रमजित मलिक, राहुल तेवातिया, रजत भाटिया,सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक, अंकीत शर्मा.