शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टायटन्सने दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली

By admin | Updated: July 19, 2015 22:11 IST

तेलगू टायटन्स संघाने अत्यंत शिस्तबध्द आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या सत्रामध्ये विजयी सलामी देताना दिल्ली दबंगचा ३६-२७ असा फडशा पाडला

रोहित नाईक , मुंबईतेलगू टायटन्स संघाने अत्यंत शिस्तबध्द आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या सत्रामध्ये विजयी सलामी देताना दिल्ली दबंगचा ३६-२७ असा फडशा पाडला. दुसरीकडे पराभूत झालेल्या दिल्ली संघाकडून सुरुवातीपासून नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यांचे सगळे प्रमुख खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याने दिल्लीची सगळी ‘दबंगगिरी’ उतरली.तेलगू संघाचा कर्णधार राहूल चौधरीने सामन्यातील पहिला गुण जिंकताना संघाचे खाते उघडले आणि त्या क्षणापासून तेलगू संघाने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. संदीप व दीपक हूडा यांनी मजबूत पकडी करताना राहूलला चांगली साथ दिल्याने तेलगूने आघाडी वाढवली. दिल्लीकडून रोहित चौधरीने झुंजार अष्टपैलू खेळी करत तेलगूला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. यानंतर तेलेगूने गुणांचा धडाका लावत ११व्या मिनिटाला दिल्ली संघावर लोण चढवून सामना १३-५ असा आपल्या बाजूने झुकवला. तेलगूच्या सुकेश हेगडेने आक्रमक चढाई करताना दिल्लीच्या जीएस मनीकांदन व रविंदर सिंग पहल यांना बाद करुन दिल्लीची आघाडी १६-६ अशी वाढवली. मध्यंतराला तेलगूने १८-८ अशी तब्बल १० गुणांची अघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मध्यंतरानंतर देखील सामन्यात फारसा काही बदल दिसला नाही. तेलगूने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. त्याचवेळी दिल्लीचे सर्वच प्रमुख खेळाडूंवरील दबाव स्पष्टपणे दिसत होता. काशिलिंग, कर्णधार जसमेर सिंग, राकेश कुमार यांसारखे सर्वच प्रमुख खेळाडू अपयशी ठरले. २८व्या मिनिटाला पुन्हा एकदा तेलगूने दुसरा लोन चढवून २६-१४ अशी एकतर्फी आघाडी घेऊन दिल्लीची हवाच काढली. दीपक हूडा व संदीप यांचा शानदार अष्टपैलू खेळाडू, मिराज शेखचा भक्कम बचाव आणि कर्णधार राहूल, सुकेश हेगडे यांची आक्रमक चढाई तेलगूच्या विजयात निर्णायक ठरले. दिल्लीकडून कर्णधार जसमेर, काशीलिंग व रोहित यांनी झुंजार खेळ केला.