शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टायटन्सने मुंबईकरांना लोळवले

By admin | Updated: August 18, 2015 22:40 IST

उपांत्य फेरीतील स्थान कधीच पक्के केलेल्या यू मुंबा व तेलगू टायटन्स या दोन बलाढ्य संघात झालेला सामना औपचारीकतेचा होता

विशाल शिर्के,पुणेउपांत्य फेरीतील स्थान कधीच पक्के केलेल्या यू मुंबा व तेलगू टायटन्स या दोन बलाढ्य संघात झालेला सामना औपचारीकतेचा होता. मात्र यावेळी दोन्ही संघांनी आपआपल्या नवोदित खेळाडूंना संधी देताना मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली. या सामन्यात तेलगू टायटन्सने अनुभवात कमी असलेल्या मुंबईकरांचा ४६-२५ असा फडशा पाडला. बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला मुंबईकरांनी नियंत्रित खेळ केला. मात्र तेलगू टायटन्सच्या आक्रमक खेळापुढे हळूहळू मुंबईकर मध्यंतराला २०-१२ असे तब्बल ८ गुणांनी पिछाडीवर गेले. यावेळी टायटन्सने यू मुंबावर एक लोन देखील चढवला.मध्यंतरानंतर यू मुंबाचे खेळाडू कशाप्रकारे प्रतिकार करतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र खेळाडूंमध्ये असलेला अनुभव स्पष्टपणे दिसून आला. ३१व्या मिनिटाला मुंबईकरांवर दुसरा लोण चढवताना टायटन्सने ३२-१८ अशी मोठी आघाडी घेतली. यावेळी पुर्णपणे दबावाखाली आलेल्या मुंबईकरांना आणखी पिछाडीवर टाकताना टायटन्सने ३७व्या मिनीटाला दुसरा लोण चढवून ३९-२० अशी एकतर्फी आघाडी घेत विजयाची केवळ औपचारीकता बाकी ठेवली.दरम्यान, मोठ्या पिछाडीनंतर मुंबईकरांनी प्रतिकार करण्याचे प्रयत्न देखील सोडल्याने सामना एकतर्फी व रटाळ झाला. अखेर टायटन्सने ४६-२५ अशा गुणांनी बाजी मारली. टायटन्सकडून आयसॅक अँथोनी, रोहित बलियान आणि प्रशांत राय यांनी दबदबा राखला. तर मुंबईकडून कर्णधार प्रदीप कुमारने तुफान चढायांसह अपयशी झुंज दिली. भूपेंद्र सिंगने अष्टपैलू खेळांसह त्याला चांगली साथ दिली.