शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

कंटाळा आणि तोही एक्सरसाइजचा?

By admin | Updated: May 12, 2017 18:32 IST

- येणारच. कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं घाम गाळताय. हे घ्या सहा फायदे इंटरवल ट्रेनिंगचे. तेही चकटफू.

 - मयूर पठाडे

 
तुम्ही व्यायाम करता, खूप करता, पण त्यानं खरंच तुम्हाला फायदा होतो का? की तोच तोच व्यायाम करुन कंटाळा येतो? आणि अपेक्षित परिणामही साधला जात नाही? ना बॉडीला टोन येत, ना वजन कमी होत, ना फिटनेस दिसत?
असं जर होत असेल तर आपलं काही तरी चुकतंय किंवा आपल्या व्यायामाच्या पद्धतीत आपण बदल केला पाहिजे हे नक्की.
घाम तर आपण गाळतो, पण तो योग्य पद्धतीनं गाळतो का यालाही व्यायामात खूप महत्त्व आहे.
त्यासाठी काय कराल?
 
 
काही सोप्या गोष्टी आहेत.
त्यातली एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे व्यायाम करताना तुम्ही इंटरवल ट्रेनिंग घेता का?
म्हणजे व्यायाम करताना थोडी रेस्ट घेता का? लक्षात घ्या, थोडी रेस्ट म्हणजे एकदम आराम नाही. व्यायाम सुरू असतानाच रिकव्हरीसाठी आपण थोडीशी म्हणजे अगदी एखाद-दोन मिनिटांची रेस्ट घेतली तरी त्यानं खूप चांगला आणि खूप लवकर फरक पडतो. एक मात्र लक्षात घ्यायला हवं, हा इंटरवल खूप छोटाही नको आणि खूप मोठाही नको. नाहीतर त्यानं फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. 
 
इंटरवल ट्रेनिंगचे फायदे
 
 
1- शारीरिक आणि मानसिक सुदृढता
व्यायामात इंटरवल घेतल्यामुळे केवळ तुमच्या शरीराचाच डौल सुधारणार नाही, तर मानसिकदृष्ट्याही तुम्ही कणखल व्हाल.
 
2- वजन झपाट्यानं कमी होईल
जर वजन कमी करणं, ते आटोक्यात ठेवणं हा जर तुमचा उद्देश असेल तर तो सफल झालाच म्हणून समजा.
 
3- कंटाळा पळून जाईल
व्यायामाला र्शीगणेशा करून काही दिवसांतच अनेक जण त्याला रामराम ठोकतात, याचं कारण त्यातला तोच तोचपणा. एकाच प्रकारचा व्यायाम आपण सातत्यानं करीत असतो. त्यामुळे कंटाळा येतो. हा कंटाळा व्यायामातील इंटरवलमुळे नाहीसा होईल आणि व्यायामाचा हुरुप वाढेल.
 
4- पैसा नको कि स्पेशल स्किल
तुम्ही व्यायामाला सुरुवात केली आहे, याचाच अर्थ सर्वात महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट तुम्ही करता आहात. त्यातला योग्य प्रकार तेवढा फक्त समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी डोकं लावण्याचीही काही म्हणजे काहीच आवश्यकता नाही.
5- फिटनेस वाढेल
या पद्धतीनं एक्सरसाइज करून बघा, तुमची व्यायामाची नुसती क्षमताच वाढणार नाही, तर तुमचा स्टॅमिनाही चांगलाच वाढेल.
 
6- वेळेची बचत
आपण व्यायामात इंटरवल घेतोय, म्हणजे आपण वेळ वाया घालवतोय असं कोणाला वाटेल, पण ते पूर्णत: चुकीचं आहे. कारण या पद्धतीनं व्यायाम केल्यामुळे कमी वेळात आणि कमी दिवसांत तुम्हाला लगेच फरक दिसेल. शास्त्रज्ञांनी आणि जगभरातील फिटनेस एक्स्पर्ट्सचंही त्यावर एकमत आहे. मग आपल्याला करून पाहायला काय हरकत आहे?