शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

त्या वेळी चंद्रशेखरने घेतले होते १२ बळी

By admin | Updated: February 26, 2017 23:52 IST

आॅस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू स्टीव्ही ओकिफीसारखा पराक्रम एका दिग्गज भारतीय फिरकीपटूने जवळजवळ ४० वर्षांपूर्वी केलेला आहे.

नवी दिल्ली : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात १२ बळी घेणारा आॅस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू स्टीव्ही ओकिफीसारखा पराक्रम एका दिग्गज भारतीय फिरकीपटूने जवळजवळ ४० वर्षांपूर्वी केलेला आहे. विशेष म्हणजे, त्या गोलंदाजाने हा पराक्रम आॅस्ट्रेलियाच्या मेलबोर्न क्रिकेट मैदानावर केला होता. त्या गोलंदाजाचे नाव आहे भागवत चंद्रशेखर. भारताचे माजी लेग स्पिनर चंद्रशेखर यांनी १९७७-१९७८ मध्ये मेलबोर्न कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात ५२ धावांच्या मोबदल्या ६, तर दुसऱ्या डावात ५२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते. चंद्रशेखर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने त्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.(वृत्तसंस्था)>ओकिफी ३५-६, ३५-६तीन दिवसांमध्ये संपलेल्या पुणे कसोटी सामन्यात ओकिफीने पहिल्या डावात ३५ धावांच्या मोबदल्या ६, तर दुसऱ्या डावातही ३५ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. एका गोलंदाजाने दोन्ही डावांत सारख्याच धावा बहाल करताना ६ बळी घेण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. >त्या वेळी २२२ आणि आता ३३३ओकिफीच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी पराभव केला, तर १९७७-१९७८ मध्ये भागवत चंद्रशेखर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता. >तीन दिवसांत गमावला कसोटी सामनापुणे कसोटी सामन्यात भारताला केवळ तीन दिवसांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मायदेशात तीन दिवसांमध्ये कसोटी सामना गमावण्याची भारताची ही पाचवी वेळ आहे. १९५१-५२ (कानपूर) - इंग्लंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभूत.१९९९-२००० (मुंबई) - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ गड्यांनी पराभूत.२०००-२००१ (मुंबई) - आॅस्ट्रेलियाविरुद्ध १० गड्यांनी पराभूत.२००७-०८ (अहमदाबाद) - द. आफ्रिकेविरुद्ध एक डाव ९० धावांनी पराभूत.२०१६-१७ (पुणे) - आॅस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी पराभूत.