शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

ऐतिहासिक विजयाच्या उंबरठयावर

By admin | Updated: September 26, 2016 00:06 IST

न्यूझीलंड संघाची आघाडीची फळी गारद करीत पहिल्या कसोटी सामन्यात मोठया विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे

ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. 25 - आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर भारताने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाहुण्या न्यूझीलंड संघाची आघाडीची फळी गारद करीत पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारताने दुसरा डाव ५ बाद ३७७ धावसंख्येवर घोषित करीत न्यूझीलंडपुढे विजयासाठी ४३४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची रविवारी, चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ९३ अशी अवस्था झाली होती. न्यूझीलंडला विजयासाठी ३४१ धावांची तर भारताला ६ बळींची गरज आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी ल्युक रोंची (३८) आणि मिशेल सँटनर (८) खेळपट्टीवर होते. न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी अश्विनची गोलंदाजी खेळणे आव्हान ठरले. अश्विनने दुसऱ्या डावात आतापर्यंत ६८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कारकिर्दीतील २०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. आॅस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटनंतर (३६ सामने) सर्वांत कमी लढतींमध्ये असा पराक्रम करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. भारताने कालच्या १ बाद १५९ धावसंख्येवरुन पुढे खेळताना दुसरा डाव ५ बाद ३७७ धावसंख्येवर घोषित केला. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा (७८), मुरली विजय (७६), रोहित शर्मा (नाबाद ६८ धावा, ८ चौकार) व रवींद्र जडेजा (नाबाद ५० धावा, २ चौकार, ३ षटकार) यांनी अर्धशतके झळकावली. विजय व पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावा जोडल्या तर रोहित व जडेजा यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर सहाव्या विकेटसाठी १०० धावांची अभेद्य भागीदारी केली. कोहली (१८) मात्र पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. धावफलकावर केवळ ३ धावांची नोंद असताना त्याचे दोन्ही सलामीवीर मार्टिन गुप्तील (०) व टॉम लॅथम (२) तंबूत परतले होते. या दोघांना अश्विनने बाद केले. त्यानंतर अश्विनने किवी कर्णधार केन विलियम्सन (२५) आणि रॉस टेलर (१७) यांच्यादरम्यानची भागीदारी संपुष्टात आणत भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. अश्विनने विलियम्सनला पायचित करीत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर टेलर विचित्रपणे धावबाद झाला. उमेश यादवचा थ्रो यष्टिवर आदळला त्यावेळी क्रिजपर्यंत पोहोचलेल्या टेलरची बॅट मात्र हवेत होती. रोंचीने भारतीय फलंदाजांपासून धडा घेत आक्रमक फलंदाजी केली. त्याने आतापर्यंत ५८ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार ठोकला. सँटनरने संयमी फलंदाजी करीत त्याला योग्य साथ दिली. (वृत्तसंस्था) धावफलकभारत पहिला डाव ३१८. न्यूझीलंड पहिला डाव २६२.भारत दुसरा डाव :- लोकेश राहुल झे. टेलर गो. सोढी ३८, मुरली विजय पायचित गो. सँटनर ७६, चेतेश्वर पुजारा झे. टेलर गो. सोढी ७८, विराट कोहली झे. सोढी गो. क्रेग १८, अजिंक्य रहाणे झे. टेलर गो. सँटनर ४०, रोहित शर्मा नाबाद ६८, रवींद्र जडेजा नाबाद ५०. अवांतर (९). एकूण १०७.२ षटकांत ५ बाद ३७७ (डाव घोषित). बाद क्रम : १-५२, २-१८५, ३-२१४, ४-२२८, ५-२७७. गोलंदाजी : बोल्ट ९-०-३४-०, सँटनर ३२.२-११-७९-२, क्रेग २३-३-८०-१, वॅगनर १६-५-५२-०, सोढी २०-२-९९-२, गुप्तील ४-०-१७-०, विलियम्सन ३-०-७-०. न्यूझीलंड दुसरा डाव :- टॉम लॅथम पायचित गो. अश्विन ०२, मार्टिन गुप्तील झे. विजय गो. अश्विन ००, केन विलियम्सन पायचित गो. अश्विन २५, रॉस टेलर धावबाद १७, ल्युक रोंची खेळत आहे ३८, मिशेल सँटनर खेळत आहे ०८. अवांतर (०३). एकूण ३७ षटकांत ४ बाद ९३. बाद क्रम : १-२, २-३, ३-४३, ४-५६. गोलंदाजी : शमी ४-०-६-०, अश्विन १६-१-६८-३, जडेजा १४-१०-८-०, यादव ३-०-९-०.