शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी बैठकीसाठी तिघांना परवानगी

By admin | Updated: February 2, 2017 00:09 IST

दुबईत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी

नवी दिल्ली : दुबईत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी बहाल केली. या सर्वांचा दर्जा मात्र सारखाच असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने या संदर्भात निर्देश देताना विक्रम लिमये, अनिरुद्ध चौधरी आणि अमिताभ चौधरी यांना आयसीसी बैठकीत सहभागी होण्याची परवानगी असून, तिघांचा दर्जा एकच असेल. बीसीसीआयने आयसीसीला प्रतिनिधींची नावे सूचित करावीत.तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे वकील श्याम दिवाण यांनी सकाळी ६ वाजता मिळालेल्या संदेशानुसार केवळ लिमये हेच आयसीसी बैठकीला जातील व अन्य दोन नावे मागे घेण्यात आल्याची माहिती कोेर्टापुढे सादर करताच न्यायालयाने वरील आदेश दिले. न्यायालयाने आधी ३० जानेवारीच्या आदेशात दुबईत २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी विक्रम लिमये, अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी यांना बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून अधिकृत केले होते. (वृत्तसंस्था)आयसीसीची मान्यतान्यायालय मित्र, ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘प्रशासकांच्या समितीने अध्यक्ष शशांक मनोहर यांना आयसीसी बैठकीत बीसीसीआयच्या तीन प्रतिनिधींंना हजर राहू देण्याची विनंती केली. आयसीसीच्या नियमानुसार एका बोर्डाचा एकच सदस्य बैठकीत हजर राहू शकतो. मनोहर यांनी ही विनंती मान्य करून सकाळी ९ वाजता बीसीसीआयला ई-मेल पाठविला. त्यात तिन्ही सदस्यांना उपस्थित राहता येईल व त्यांच्या विमान तिकिटांची व्यवस्था करण्यात येत असल्याचा निरोप दिला.’’