शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

सहाऐवजी तीन दिवसांचे सरावसत्र उपयुक्त

By admin | Updated: March 3, 2015 00:57 IST

विश्वकप स्पर्धेसारख्या प्रदीर्घ कालावधीच्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा उत्साह कायम राखण्यासाठी सहा दिवसांच्या सर्वसाधारण सराव सत्रापेक्षा तीन दिवसांचे कसून मेहनतीचे सराव सत्र उपयुक्त ठरतात.

पर्थ : भारतीय क्रिकेट संघाच्या अनियमित सराव सत्रांमुळे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मते, विश्वकप स्पर्धेसारख्या प्रदीर्घ कालावधीच्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा उत्साह कायम राखण्यासाठी सहा दिवसांच्या सर्वसाधारण सराव सत्रापेक्षा तीन दिवसांचे कसून मेहनतीचे सराव सत्र उपयुक्त ठरतात.दक्षिण आफ्रिका व यूएई यांच्यादरम्यानच्या लढतींमध्ये चार दिवसांचा विश्रांतीचा कालावधी असताना भारतीय संघाने केवळ दोन दिवस सराव केला. वाकामध्ये शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी पाच दिवसांची विश्रांती मिळाली असली तरी भारतीय संघ केवळ दोनच दिवस सराव करणार आहे. यूएईविरुद्धच्या लढतीनंतर दैनंदिन सरावाबाबत धोनीने आपले मत व्यक्त करताना म्हटले,‘‘आम्ही ‘वर्कलोड शेअर’ करण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस विश्रांती व एक दिवस सराव असा प्रयत्न असतो. सहा दिवसांच्या सर्वसाधारण सरावापेक्षा तीन दिवसांचा कसून सराव चांगला असतो. कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाने आॅस्ट्रेलियातील जवळजवळ सर्वच केंद्रांवर सामने खेळले आहेत. काही आठवड्यांमध्ये खेळपट्टीमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे संघासाठी काही विशेष योजना ठरविण्याची गरज नाही.’’धोनी पुढे म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विश्वकप स्पर्धेचा समावेश केला तर हा चार ते पाच महिन्यांचा दौरा राहील. वातावरणाबाबत विचार करता आम्हाला येथील सर्व बाबींची चांगली माहिती झाली आहे. आम्ही येथील जवळजवळ सर्वच स्थळांवर खेळलो असल्यामुळे खेळपट्ट्या कशा आहेत, याची कल्पना आहे. सात आठवडे कालावधीच्या या स्पर्धेत संघातील खेळाडू मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे ठरते. एकापाठोपाठ सामने खेळत असताना सरावापेक्षा विश्रांती महत्त्वाची आहे. सराव व विश्रांती याचा योग्य ताळमेळ साधण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. सराव करीत नाही, त्या दिवशी आम्ही जिममध्ये जातो, जलतरण करतो किंवा टेनिस खेळतो. त्यामुळे उत्साह कायम राखण्यास मदत मिळते.’’ सन २०११च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने खेळाचा दर्जा उंचावला आणि अखेरपर्यंत कायम राखला. या वेळी धोनी त्यासाठी प्रयत्नशील आहे. या वेळीही आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक वेळी योजनेप्रमाणे सर्वकाही घडत नाही. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असायला हवे. आतापर्यंत सर्व काही आमच्यासाठी चांगले घडले. बाद फेरीमध्ये कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार