फरिदाबाद : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या लढतीच्या वेळी सट्टा लावताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून सात मोबाईल फोन, एक एलसीडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांच्या पत्रकानुसार सेक्टर नं. १७मध्ये आयपीएल स्पर्धेवर प्रविण नावाचा युवक सट्टा लावत असल्याचे कळाले होते. त्यानुसार तेथे छापा टाकून पोलिसांनी प्रविणला अटक केली. प्रविण हा मूळचा सोनीपथ येथे राहणारा आहे. दुसरीकडे सेक्टर नं. ३०मध्ये नरेंद्र चव्हाण याच्या सूचनेवरून पोलिसांनी सेक्टर नं. १६ मधील दुकानावर छापा मारला. त्याचप्रमाणे सेक्टर ८२, सेक्टर १८ मध्ये अनुक्रमे सौरभ आणि सोनू यांना सुद्धा अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राजू या सट्टेबाजाला पोलीस शोधत आहेत.
तीन सट्टेबाजांना अटक
By admin | Updated: May 6, 2015 03:03 IST