शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

थॉमस-उबेर चषक: भारतीय बॅडमिंटनपटूंना कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:11 IST

थॉमस-उबेर चषक आजपासून : सायना, प्रणय यांच्यावर भिस्त

बँकॉक : पीव्ही सिंधू तसेच किदाम्बी श्रीकांत यांच्या अनुपस्थितीत आजपासून सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक गटात भारताची भिस्त अनुभवी सायना नेहवाल आणि एचएस प्रणय यांच्या कामगिरीवर असेल. भारतीय महिला संघाने मागील दोनवेळा या स्पर्धेत कांस्य पदक जिनकले आहे. पुरुष खेळाडू मात्र गेल्या आठ वर्षांत थॉमस चषकात उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करु शकले नाहीत.पुरुष संघात विश्व क्रमवारीत नवव्या स्थानावरील प्रणयसह सिंगापूर ओपनचा विजेता बी. साईप्रणित, स्विस ओपन विजेता समीर वर्मा, आणि ज्युनियरमध्ये विश्व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन यांचा समावेश आहे. दुहेरीची भिस्त राष्टÑीय चॅम्पियन मनू अत्री- बी. सुमित रेड्डी तसेच एमआर अर्जुन- श्लोक रामचंद्रन यांच्या कामगिरीवर असेल. भारताचा अ गटात आॅस्ट्रेलिया, झ्रान्स आणि बलाढ्य चीनसह समावेश आहे.महिला संघ अ गटात कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि दिग्गज जपान संघांसोबत असून उपांत्यपूर्व फेरीसाठी पहिल्या दोन स्थानांवर रहावे लागणार आहे. महलिा संघात सिंधूसह दुहेरीत अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांचीही उणिव जाणवेल. सायनाने स्वत:चे सामने जिंकले तरी जपान आणि कॅनडाविरुद्ध संघातील सहकारी वैष्णवी रेड्डी, साई कृष्णप्रिया, अनुरा प्रभुदेसाई आणि वैष्णवी भाले यांनी आपापले सामने जिंकावेत, यासाठी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करावे लागणार आहे. दुहेरीत प्राजक्ता सावंत- संयोगिता घोरपडे, पूर्वीशा राम- मेघना या जोडींकडून काहीशा अनपेक्षित कामगिरीची अपेक्षा राहील. (वृत्तसंस्था)आव्हान कडवे आहे. आमचा संघ युवा आहे. पदक जिंकण्यासाठी आधी फ्रान्सला हरवून बाद फेरी गाठण्यावर भर असेल. उपांत्यपूर्व फेरीत कोरिया किंवा इंडोनेशियासारख्या संघाविरुद्ध लढत झाली तरी एकेरीत आम्हाला भरपूर संधी असेल.- बी. साईप्रणित, भारतीय बॅडमिंटनपटू.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा